- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rahul-gandhi-pramod-sawant: राहुल गांधी यांच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज - प्रमोद सावंत यांचे विधान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राहुल गांधी यांनी काल आपल्या जाहीर भाषणात पत्रकारांना मोदींचे गुलाम म्हणून म्हटलं होतं यावर बोलताना, ’ आम्हाला काही बोलले तर ठीक आहे. मात्र पत्रकारांवर टीका करणे हे योग्य नाही ’ असं वक्तव्य गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं.
अकोल्यात भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारासाठी आयोजित उद्योजकांच्या सभेसाठी आले असता माध्यमांशी ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी अनेक वेळा अनेक लोकांचा अपमान केलं असून राहुल गांधी यांच्या विरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचही सावंत म्हणाले. महायुतीची सरकार स्थापन झाल्यास कृषी आधारित उद्योगाच्या जीएसटीच्या प्रलंबित समस्या मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सावंतांनी उद्योजकांना दिले.
गोवा हे छोट राज्य असून महाराष्ट्राकडून गोव्याला मदत झाली पाहिजे असल्याचं ही ते म्हणाले. मुंबई – गोवा महामार्ग हा ठेकेदाराच्या अपयश मुळे पूर्ण होऊ शकला नसून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचं आश्वासन सावंत यांनी दिले.
उद्योजक व्यापारी यांचेशी चर्चा
जीएसटी मुळे विकास कामाला गती मिळून व्यापाऱ्यांना करांमध्ये सुटसुटीत वाढ झाली आहे. अनेक अडचणीतून सुटका होऊन जीएसटी मध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सर्वांच्या भावना समजून घेण्यासाठी व देशाचे अर्थमंत्री निर्मला रामन रामन हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधीबद्ध असून व्यापार उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने उद्योजक भूमिका महत्त्वाची असून महायुतीला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले.
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती लक्षात घेता महायुती ची गरज का व्यापाऱ्यांना होणाऱ्या अडचणी मध्ये वाढ होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वसुलीखोर महाविकास आघाडी पासून सावध राहा तसेच उद्योगधंदे यांच्या विकासासाठी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध असून अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी उद्योजकांनी व व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यासाठी आपण राज राजेश्वर नगरीमध्ये आलो असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.
सावंत यांच्या सोबत भाजपा प्रदेश उद्योजक आघाडीचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर होते.
मंचावर मध्य प्रदेशचे सहकार मंत्री नामदार विश्वास सारंग, खांडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील, महायुती अकोला पश्चिम उमेदवार विजय अग्रवाल, जयंत मसने, संतोष झुंजूनवाला, शिव शर्मा, विशाल मनवाणी, भाजपा प्रदेश प्रवक्ता अशीस चांदाराणा होते.
स्थानिक व्यापाऱ्यांची त्यांनीही हितगुज केले व समस्या जाणून घेतल्या महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वास सारंग यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सर्वांना मोहित केले.
याप्रसंगी वसंत खंडेलवाल, प्रमोद वाकोडकर, विजय अग्रवाल यांचेभाषणे झाली. शहरातील व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणे उद्योजक उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा