narendra-modi-assembly-elec: महाराष्ट्राला मेगा घोटाळेबाजांचे एटीएम बनू देवू नका- नरेंद्र मोदी यांचे विधान







नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 


*महाराष्ट्रातील लाखो गरिबांचे पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण होईल.


*महाराष्ट्रात आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.


*येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रासोबतच देशाच्या भविष्याला दिशा देण्याची संधी मिळणार आहे.


*भाजप-महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाची गती दुपटीने वाढेल.




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काँग्रेसचे सरकार जेथे बनते ते राज्य शाही परिवाराचे एटीएम होवून जाते. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक हे राज्य शाही परिवाराचे एटीएम झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटक, तेलंगणामध्ये वसुली करणे सुरू झाली आहे. मद्य विक्रेत्यांकडून 700 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, असा गंभीर आरोप करीत महाराष्ट्राला महाआघाडी च्या मेगा घोटाळेबाजांचे एटीएम बनू देवू नका, असे आवाहन पंतप्रधान तथा भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी केले.



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आज 9 नोव्हेंबर रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.





मराठी भाषेतून भाषणाला सुरुवात 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यामध्ये आपल्या भाषणाचे सुरुवात मराठी भाषेतून करून हजारो लोकांचे मन जिंकले. “अकोल्यातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. भगवान राज राजेश्वर, बार्शीटाकळीची कालिकादेवी, अकोटचे नंदिकेश्वर, बाळापुरची बाळादेवी, पातूरची रेणुका माता, काटेपूर्णाची ढगादेवी यांना मी कोटी कोटी वंदन करतो”, असे म्हणून त्यांनी मी संत गजानन महाराज यांना नमन करतो. विदर्भचा आशीर्वाद माझ्यासाठी खास असतो आणि मी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक करिता तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.




आज ऐतिहासिक तारीख


आज 9 नोव्हेंबर आहे आणि ही एक ऐतिहासिक तारीख आहे. 2019 मध्ये याच दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. 9 नोव्हेंबर ही तारीख देखील लक्षात राहील, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी प्रचंड संवेदनशीलता दाखवली. राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद आहे, असे मोदी यांनी म्हंटले.




महाराष्ट्राच्या सेवेचं सुखचं वेगळं 


महाराष्ट्रातील लोकांना राजकीय समज चांगला आहे. महाराष्ट्रातील लोकांची दूरदृष्टी खूप चांगली आहे. यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्राच्या सेवेचं सुखचं वेगळं आहे,असे मोदी म्हणाले.




शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नव्या संधी


कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना चालना देण्यात येत आहे. मी महाराष्ट्रात एका टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली आहे. टेक्स्टाइल पार्कमुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत,असे मोदी यांनी सांगितले.



कारस्थानापासून सावध राहा


काँग्रेस पक्षाला माहीत आहे की, देश जितका कमकुवत होईल तेवढी काँग्रेस मजबूत होईल. त्यामुळेच ते वेगवेगळ्या जातींमध्ये भांडण लावत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या घातक कारस्थानापासून सावध राहा. तुम्ही लक्षात ठेवा एक रहेंगे तो सेफ रहेंगे,असे आवाहन मोदी यांनी उपस्थितांना केले.



काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान पुन्हा काश्मीर बाहेर जाईल. मात्र, ते आम्ही होवू देणार नाही. संविधान घेऊन फिरणारे ढोंगी आहेत. त्यांनी 75 वर्ष काश्मीरमध्ये संविधान लागू होवू दिले नाही, असे वक्तव्य करीत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले.




तत्पूर्वी, आशीर्वाद सभेचे प्रास्ताविक खासदार अनुप धोत्रे यांनी केले.





सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अनुप धोत्रे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, गोपी किसन बजोरिया, आमदार अमोल मिटकरी, उमेदवार रणधीर सावरकर, डॉ. संजय कुटे, विजय अग्रवाल, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार यांच्यासह पश्चिम वऱ्हाडातील महायुतीचे उमेदवार व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक खासदार अनुप धोत्रे यांनी केले. यावेळी उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.



टिप्पण्या