- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
maha-ganapati-idol-khamgaon: खामगावातील स्वयंभू महागणपती मूर्ती प्राचीन असल्याचा दाखला प्राप्त; तात्पुरते प्रमाणपत्र मंदिराकडे सुपूर्द
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्वयंभू महागणपती रिद्धी सिद्धी मूर्ती, ही प्राचीन आणि शालिग्राम पासून तयार झाली असून साडेपाच हजार वर्षाची जुनी असल्याचा दाखला पुरातन विभागाने दिला आहे. याबाबतचे प्रमाणपत्र श्री गणपतीला भाजपा अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांच्या हस्ते आज अर्पण करण्यात आले.
खामगाव येथील देशमुख पेठ येथील मनोकामना सिद्धी करणाऱ्या महागणपती प्राचीन मंदिराला पुरातन विभाग पुणे आणि संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. पाहणी केल्यानंतर ही मूर्ती शालिग्राम पासून तयार झालेली जागृत असल्याचा दाखला दिला आहे. याबाबतचे तात्पुरते प्रमाणपत्र त्यांनी प्रदान केले आहे.
श्री गणरायाला आज बुधवार रोजी सकाळी महाआरती होऊन मंदिरचे मठाधिपती जयकुमार धामणे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी विशेष पूजा अर्चना करण्यात आली महाराष्ट्रातून सर्व भागातून मोठ्या प्रमाणात चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांच्या व्यक्तिगत समस्या, सामाजिक समस्याचे निराकरण गणपती करते, अशी श्रद्धा परिसरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची येथे गर्दी असते.
प्रमाणपत्र देतेवेळी छोटीबाई धामणे, मनीषा धामणे, अनिल गवई, शितल चोंडीकर, बाळू चोंडीकर, श्रद्धा जाधव, विजय चोंडीकर, गोलू पिंपळेकर, अंजू चव्हाण, नंदू धामणे, शितल पांडे, अजय पांडे, यमुना झापर्डे, मोना परदेशी, सपना चावरिया, अंजू चव्हाण, गणपत चौधरी, हरिश्चचंद्र चौधरी, हिम्मत चौधरी, विष्णू चौधरी, गिरीराज तिवारी, ओमप्रकाश तिवारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भात मोजक्या ठिकाणीच अशा प्राचीन मूर्तींची पाहणी पुरातन विभाग द्वारा करण्यात आली आहे. यामुळे या क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा