भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र मतदान केंद्र येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मतदानापासून वंचित राहाव लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
अकोल्यात पोलिसांनी आपल्या मतदानच हक्क बजावला. मात्र, अनेक पोलिसांनी फॉर्म 12 भरून सुद्धा त्याचं नाव मतदार यादीत न आल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहाव लागलं.

पोलिसांना जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर कर्तव्य बजावण्यासाठी आज रवाना करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाना पासून वंचित न राहावं याकरिता त्यांना बॅलेट पेपरद्वारे मतदानाची सुविधा देण्यात आली होती.
फॉर्म 12 भरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नावे यादीत सापडली नसल्याने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना मतदान न करता परत जावं लागलं आहे.

या कर्मचाऱ्यांनी लोकसभेत मतदान केलं होतं. 12 नंबरच फॉर्म भरला आहे. मतदान कार्ड असूनही हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहेत. मात्र निवडणूक विभागाने पोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या फॉर्मच्या आधारावर यादी तयार केली असल्याच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस विभागाने या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला देण्यात दिरंगाई केली आहे की निवडणूक विभागाने? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचा-यांचे
मतदान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू
अकोला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणा-या कर्मचा-यांपैकी 5 हजार 774 कर्मचा-यांनी 16 नोव्हेंबर अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर मतदान सुविधा केंद्रात या सर्व मतदान कर्तव्यावरील कर्मचा-यांचे मतदान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती टपाली मतपत्रिका नोडल अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
मतदान कर्तव्यावर असणारे 8 हजार 436 मतदान कर्मचारी, 2 हजार 270 पोलीस, होमगार्ड कर्मचारी अशा एकूण 10 हजार 706 कर्मचा-यांना टपाली मतदान करणे शक्य व्हावे म्हणून नमुना 12 वितरित करण्यात आला होता. ज्या कर्मचा-यांनी हा नमुना व आवश्यक कागदपत्रे जमा केली. अशा 10 हजार 202 मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे.
मतदान कर्तव्यावर नियुक्त 1 हजार 993 कर्मचा-यांची नोंदणी राज्यातील इतर मतदारसंघात आहे. अशा मतदारांच्या मतपत्रिका देखील विभागस्तरीय व राज्यस्तरीय केंद्रातून प्राप्त झाल्या असून. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मतदान सुविधा केंद्रांकडे पाठविण्यात आल्या आहेत. एकूण 10 हजार 202 मतदारांपैकी 5 हजार 774 मतदारांनी 16 नोव्हेंबरअखेर आपला मतदानाचा बजावला.
उर्वरित निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचा-यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील सुविधा केंद्रात जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे सुविधा केंद्र 19 नोव्हेंबरपर्यंत कार्यान्वित असेल.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कर्तव्यावरील कर्मचा-यांचे मतदान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, अकोला पश्चिम मतदारसंघात सोमवारी अनेक पोलीस कर्मचा-यांनी मतदानाचा हक्क बजावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा