e-waste-science-essay-compti: राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेत प्रणाली गावंडे विदर्भात अव्वल; “इ - कचरा " विषयावर केले उत्तम लेखन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मराठी विज्ञान परिषद मुंबई द्वारा आयोजित राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा 2024 मध्ये प्रणाली अनिल गावंडे हिने विदर्भ विभागात विद्यार्थी गटात अव्वलस्थान पटकाविले.



"इ - कचरा " या विषयावर प्रणाली हिने 

स्पर्धेत निबंध सादर केला. विषयाची उत्तमरित्या मुद्देसूद मांडणी केल्याने प्रणालीने विदर्भातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा आयोजकांनी रमाकांत टिपणीस पारितोषिक प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून सन्मानित केले.




प्रणाली ही आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि गुरुजन यांना देते. याआधी देखील प्रणालीने विविध स्पर्धेत पारितोषीक पटकाविली आहे. 





याबद्दल प्रणालीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. प्रणाली ही सिनेमा क्षेत्रात कार्यरत असलेले सिनेमा वितरक अनिल (अण्णा) गावंडे यांची कन्या आहे.

टिप्पण्या