- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
counting-of-votes-in-akola-dist: अकोल्यात मत मोजणीला सुरुवात; दुपार पर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता ; पहिल्या फेरीत रणधीर सावरकर आघाडीवर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम केलेला असून सदर निवडणूक कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर, 30-अकोला (पश्चिम), 31-अकोला (पूर्व) व 32-मुर्तिजापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघाकरीता 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात आले. या मतदानाची मतमोजणी आज 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजतापासून सर्व संबंधीत मतदार संघाचे ठिकाणी करण्यात येत आहे.
सकाळी 8 वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरु कऱण्यात आली असून, त्यानंतर मतदान यंत्रावरील (CU) मतमोजणी सुरु झाली.
मतमोजणी केंद्राचे ठिकाण:
28-अकोट:
गोदाम क्रमांक 5, कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर, पोपटखेड रोड, अकोट
29-बाळापूर:
शासकीय धान्य गोदाम क्रमांक 1, खामगाव रोड, बाळापूर
30-अकोला (पश्चिम):
शासकीय धान्य गोदाम क्रमांक 1,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला
31-अकोला (पूर्व):
शासकीय धान्य गोदाम क्रमांक 2,
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला
32-मुर्तिजापूर (अ.जा.):
शासकीय धान्य गोदाम क्रमांक 5,
उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ, मुर्तिजापूर
येथे मत मोजणी सुरू असुन दुपार पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहिली फेरी
रणधीर सावरकर यांना 3993 मते
गोपाल दातकर 2659 मते
ज्ञानेश्वर सुलताने 1625 मते
पहिल्या फेरीत रणधीर सावरकर आघाडीवर
अकोला पूर्व तिसरी फेरी
भाजपचे रणधीर सावरकर 3789 मते
उद्धव सेनेचे गोपाल दातकर 3688 मते
वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांना 1566 मते
तिसऱ्या फेरी अखेर ऐकून मतांची संख्या
भाजपचे रणधीर सावरकर यांना तिसऱ्या फेरी अखेर ऐकून दहा हजार 942 मते, उद्धव सेनेचे गोपाल दातकर यांना 9332 मते तर वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांना तिसऱ्या फेरी अखेर 5106 मते प्राप्त झाली आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा