- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-assembly-election: राजेश मिश्रा यांची उमेदवारी कायम; अकोला पश्चिम मध्ये भाजपचे वाढले प्रेशर !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकची maharashtra assembly election 2024 तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी अधिक रंजकता येत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. आपल्या पक्षाशी बंड करुन अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार करूनच विजयाचा झेंडा हाती घेवून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यापैकीच एक राजेश मिश्रा. त्यांनी अकोला पश्चिम मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेवून या निर्णयावर ते ठाम आहेत. भारतीय अलंकार न्यूज 24
राजेश मिश्रा यांची उमेदवारी कायम राहिली असून, त्यांना 'प्रेशर कुकर' चिन्ह मिळालेले आहे. दरम्यान प्रेशर कुकर या चिन्हामुळे आज भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा प्रेशर वाढला असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. BAnews24
अकोला पश्चिम Akola West मतदारसंघात भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. भाजपाचे अशोक ओळम्बे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करीत प्रहार पक्षात प्रवेश घेत उमेदवारी पदरी पाडून घेतली. BAnews24 तर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे साजीद खान पठाण यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने राजेश मिश्रा यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. मात्र बंडखोरी महविकास आघाडी मध्ये झाली असली तरी जुने शहरातील हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनामुळे अडचण भाजपची होणार आहे, हे स्पष्ट दिसत असल्याने राजेश मिश्रांनी माघार घ्यावी, यासाठी शिवसेना ठाकरे पक्षा पेक्षा भाजपचेच अधिक प्रयत्न सुरू होते. भारतीय अलंकार न्यूज 24
आज सुध्दा राजेश मिश्रा आणि भाजपा कार्यकर्ते मधे निवडणुक अधिकारी यांच्या दालनासमोरच वाद झाला. मात्र वरिष्ठांनी मध्यस्थी करून प्रकरण तात्पुरते शमविले. मात्र येत्या निवडणूक काळात ही वादाची ठिणगी पेट घेते की शांत राहील, हे कळेलच. मात्र राजेश मिश्रा यांच्या उमेदवारी मुळे भाजपला या मतदार संघासाठी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे, एवढे मात्र निश्चित.
भारतीय अलंकार न्यूज 24
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा