- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-court-murder-case-acqt: पत्नीच्या हत्या प्रकरणी आरोपी पती व भाच्याची निर्दोष मुक्तता; दम्माणी हॉस्पिटल जवळील घटना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. शितल देवानंद गवई
आरोपी तर्फे वकील

भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: एकता नगर दम्माणी हॉस्पिटल जवळ सन 2020 मध्ये कौटुंबिक कलहातून घडलेल्या हत्या प्रकरणात मृतक महिलेचा आरोपी पती व भाच्याची अकोला न्यायालयाने पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात न्यायालयामध्ये आरोपींची बाजू ॲड. शितल देवानंद गवई यांनी मांडली.
जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र . 1 ए . डी . क्षीरसागर यांनी पत्नीच्या खुनाचा आरोप असलेल्या गुन्हयातून आरोपी पती व भाचा यांची 05 नोव्हेंबर 2024 रोजी, आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द न झाल्यामुळे पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, 20 नोव्हेंबर 2020 रोजी फिर्यादी मानव उर्फ सोनू प्रशांत इंगळे (रा .अकोट फैल , अकोला) याने पो.स्टे . सिव्हील लाईन, अकोला येथे तक्रार दिली होती की, त्याचे वडील प्रशांत इंगळे व आई संगीता प्रशांत इंगळे या दोघांमध्ये वाद विवाद असल्यामुळे ते दोघे पती पत्नी अनेक वर्षांपासून वेगळे राहतात. आरोपी प्रशांत इंगळे हा कामानिमित्त नाशिक येथे राहत होता. तो 13 नोव्हेंबर 2020 रोजी अकोला येथे नाशिक वरून परत आला होता. 19 नोव्हेंबर 2020 रोजी आरोपी प्रशांत याने त्यांची दोन्ही मुले मानव उर्फ सोनू प्रशांत इंगळे व विनायक प्रशांत इंगळे यांना जेवण करण्यासाठी घरी बोलाविले होते. जेवण करून ते घरी बसलेले होते. त्यावेळी सायंकाळी 6.30 वाजताचे सुमारास मृतक संगिता प्रशांत इंगळे ही दोन्ही मुलांना शोधत पती प्रशांत इंगळे यांच्या घरी दम्मानी हॉस्पिटल एकता नगर येथे आली. यावेळी दोघा पती पत्नी मध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी प्रशांत इंगळे आणि त्याचा भाचा विक्की मनोहर गोपे या दोघांनी तलवार व चाकूने संगीता प्रशांत इंगळे हिच्या पोटावर व गळ्यावर वार करून तिला जिवानिशी ठार मारले. त्यानंतर आरोपी प्रशांत इंगळे याने मृतक संगीता हिचा मृतदेह पाय धरून ओढत आणला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्तावर पाणी टाकले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत इंगळे व विक्की मनोहर गोपे यांचे विरुद्ध पो . स्टे . सिव्हील लाईन , अकोला येथे 20 नोव्हेंबर 2020 रोजी अपराध क . 485/2020 भा.दं.वि. चे कलम 302, 201 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी हे अकोला कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदीस्त होते.
ॲड. शितल देवानंद गवई यांचा युक्तिवाद ग्राहय
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश क्रमांक 1 , ए . डी . क्षीरसागर यांचे न्यायालयात चालले. न्यायालयाने आरोपी विरुद्ध एकुण 11 साक्षीदार तपासले. परंतू आरोपीचे वकील शितल देवानंद गवई यांनी न्यायालयास पटवून दिले की, मृतक संगीता प्रशांत इंगळे हिचे गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम मेहबुब दौला याचे सोबत अनैतिक संबंध होते. त्या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाल्यामुळे आरोपी मेहबुब दौला याने मृतक संगिता हिला ठार मारले. त्यानंतर तिचा पती प्रशांत इंगळे व भाचा विक्की मनोहर गोपे यांचे विरूध्द खोटेनाटे आरोप करून त्यांना खोटया गुन्हयात अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद ॲड. शितल देवानंद गवई यांनी न्यायालयासमोर केला.आरोपींचे वकील शितल देवानंद गवई यांचा हा युक्तीवाद ग्राहय धरून तसेच आरोपी पती व भाचा यांच्या विरुध्द कुठलाही सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे पुराव्या अभावी दोन्ही आरोपींची सदर गुन्हयातून 05 नोव्हेंबर 2024 रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी बाजू ॲड. शितल देवानंद गवई यांनी सक्षमपणे मांडली.
adv shital gawai
Court news
Dammani Hospital
Ekta nagar Akola court
family dispute
murder case
session court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा