vishwas-sarang-mp-bjp-akola: महाराष्ट्राला कंगाल करण्याच्या निर्धाराने महाविकास आघाडीचं कार्य - नामदार विश्वास सारंग यांचे विधान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काँग्रेस आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रातील बहुसंख्यांकांच्या मतांची विभाजन करून सत्तेवर येण्याच्या दृष्टीने तसेच कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्राला कंगाल करण्याच्या निर्धाराने कार्य करीत आहेत, असे विधान भाजप नेते तथा मध्य प्रदेशचे सहकार मंत्री नामदार विश्वास सारंग यांनी केले. 



भाजपा कार्यालयात आज विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (ए पी) यांच्या संयुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 




महायुती महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या कल्याण करण्याच्या व देशामध्ये एक नंबरचा आर्थिक सामाजिक भौगोलिक महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संकल्प घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मार्गदर्शनात 288 ठिकाणी विजयाचा झेंडा घेऊन कार्याला लागा. महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा राज्य असून संत महात्मा तसेच सामाजिक समरसतेचा महाराष्ट्रातून बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी झाशीची राणी ज्योतिबा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज, तात्या  टोपे, झाशीची राणी लोकमान्य तिलक, यांची भूमी असून विठोबा तुळजाभवानी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर यांची भूमी वारकरी संप्रदाय सोबत सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही भूमी दिशादर्शक असल्यामुळे २० नोव्हेंबर रोजी महायुती सरकारला मतदानासाठी जनता जागृत असून आपल्या केवळ मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी व ‘बटेंगे तो कटेंगे’ हा धोरण लक्षात घेऊन कामाला लागा असे आवाहन मध्य प्रदेशचे मंत्री सहकार मंत्री नामदार विश्वास सारंग यांनी केले. 





यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, अश्विन नवले, योगेश अग्रवाल, नितीन झापर्डे, अजय मते, सुरेश रामेकर, मंजुषा देशमुख आदी मंचावर विराजमान होते. 



यावेळी विधानसभा निहाय आढावा घेऊन समयवर कशा पद्धतीने करावे व प्रचाराचे धोरण आखण्यात आले. आमदार रणधीर सावरकर , खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.





गजानन पाटील, पवन गाडे, गौरव देशमुख, दीपक गावंडे, गजानन खारोडे, विपुल काळे, श्रीकृष्ण मोरखडे, उमेश पवार, डॉक्टर संजय शर्मा ,एडवोकेट देवआशिष काकड, माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेश अल्करी, रमेश गायकवाड, रणजीत खेडकर, कमलाकर गावंडे, दीपक तांदळे, महादेव काकड, संदेश काजळेकर, विनोद थिटे आदी उपस्थित होते. 



टिप्पण्या