भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: 105 योजना सर्वसामान्यांसाठी सुरू करून महायुती सरकारने महाराष्ट्राचा विकास साधला. तीर्थस्थळ विकास करून संस्कृती संवर्धनासोबत मातृशक्तीसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिलेदारांना अकोला पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांना प्रचंड बहुमताने अकोलेकर पंचकोशीतील नागरिक पुन्हा विश्वास संपादन करून स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी सुरू केलेली सुखदुःखात सहभागी होणारी परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास मध्य प्रदेश सरकारची सहकार मंत्री नामदार विश्वास सारंग यांनी व्यक्त केला.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांचा नामांकन पत्र दाखल करताना ते बोलत होते.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, अश्विन नवले, शशी चोपडे, योगेश अग्रवाल, जयंत मसने, हरीश आलीमचंदानी, कृष्णा शर्मा, डॉक्टर योगेश शाहू, बळीराम सिरस्कार, माजी आमदार बाबूलाल महाजन, अर्चना मसने, चंदा शर्मा, उषा विरक, रमेश गायकवाड, मनोज गायकवाड, अशोक गुप्ता, झापर्डे, विजय पनपालिया तसेच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी महायुतीचे सहाही उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघातील विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करून महायुती सरकार महाराष्ट्रात स्थापना होऊन 180 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विकासासोबत ज्येष्ठ आणि नवीन कार्यकर्त्यांसोबत सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सर्वव्यापी विकास व राज राजेश्वर नगरीचा विश्वास भाजपा महायुतीच्या पाठीशी असून हा विश्वास 20 नोव्हेंबर रोजी मतदान पेटी द्वारे सिद्ध होणार, असे यावेळी सांगितले.
यावेळी ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी व महिलांनी ओवाळणी केली.
तत्पूर्वी विजय अग्रवाल, सुनीता अग्रवाल यांनी राजराजेश्वर मंदिर तपे हनुमान मंदिर, आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नामांकन पत्र दाखल करताना उपस्थित होते.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने अनेक प्रबळ दावेदारांना डावलून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली.
अद्यापही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि माहाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला नाही. भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज भरला. या ठिकाणी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची नाव गुलदस्त्यात ठेवल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली.तर मतदारसंघाचं विकास करणार असल्याचं यावेळी अग्रवाल म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा