- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक करिता उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली असून, यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर जिशान हुसेन यांना अकोला पश्चिम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुनील धाबेकर यांना कारंजा मतदार संघासाठी तिकीट देण्यात आली आहे.
अकोला पश्चिम मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण आणि डॉक्टर जिशान हुसेन यांच्या काट्याची टक्कर होण्याची चिन्ह दिसत आहे. अकोला पश्चिम मतदार संघात डॉक्टर हुसेन यांची प्रबळ दावेदारी मानल्या जात होती. मात्र काँग्रेसने काल रात्री येथे साजिद पठाण यांची उमेदवारी जाहीर केल्याने डॉक्टर हुसेन यांनी नाराजी व्यक्त केली.
डॉक्टर हुसेन हे माजी राज्यमंत्री खान मो. अजहर हुसेन यांचे सुपुत्र असून, हे घराणे भारतीय राष्ट्रिय काँग्रेसशी पूर्वापार एकनिष्ठ राहिले आहे. मात्र तरीदेखील काँगेसने डॉक्टर हुसेन यांची उमेदवारी नाकारल्याने डॉक्टर हुसेन यांनी वंचितची साथ घेतली आहे.
हीच परिस्थिती सुनील धाबेकर यांची आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या राजकारणात वेगळा ठसा सुनील धाबेकर यांनी उमटविला आहे. काँग्रेसचे बडेनेते माजी राज्यमंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे ते सुपुत्र असून धाबेकर घराणे काँग्रेस सोबत पूर्वापार एकनिष्ठ आहे. अकोल्यात काँग्रेसचे पाळेमुळे घट्ट रोवण्याचे काम धाबेकर घराण्याने केले आहे. मात्र सुनील धाबेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. यामुळे सुनील धाबेकर यांनी वेगळी वाट धरली.
अशी आहे यादी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा