theft-case-khemka-apartment: खेमका अपार्टमेंट मधील चोरी प्रकरण: तामिळनाडूतील चारही आरोपींची जमानतवर कारागृहातून सुटका





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील रतनलाल प्लॉट स्थित खेमका अपार्टमेंट मधील चोरी प्रकरणात अटकेतील आरोपी मुनीअप्पम कुय्यम,  शिवा कुप्पम, वीणा नारायण,  वेंकटेश नारायण शिवा (सर्व रा. वेल्लोर तामिळनाडू)  या चौघांचीही आज मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला न्यायलयाने  कारागृहातून जमानतवर अटी व शर्ती ठेवून सुटका केली. सर्व आरोपींतर्फे अधिवक्ता प्रफुल सुरवाडे यांनी न्यायालय समोर युक्तिवाद केला. 



घटनेची हकिकत अशी की, 21 ऑक्टोबर 2024 रोजी फिर्यादी न योगेश जुगलकिशोर बियाणी (वय 48 वर्ष रा. खेमका प्लॉट, रतनलाल प्लॉट, अकोला.) यांनी पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला येथे रिपोर्ट दिला की, तो  21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजता त्याचे राहते घरातुन जिम मध्ये जाणे करीता निघाला.  त्याने त्याचे घराचे दार ओढुन घेतले. कुलुप लावले नाही. त्याचे घरात त्याची पत्नी व मुले झोपलेले होते.  याची पत्नी सकाळी साडे आठ वाजता झोपेतुन उठली असता, त्यांचे लक्षात आले की, घरातील तीन मोबाईल व टेबल वरील चार नग सोन्यााचे अंगठया असा एकुण दीड लाख रुपयेचा मुद्देमाल दिसला नाही. त्यावरून घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अशा जबानी रिपोर्ट वरून पो. स्टे रामदास पेठ अकोला येथे अप.क 376/24 कलम 305 भा. न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला येवून तपासास घेतला.


या गुन्ह्याची उकल व्हावी, याकरीता  पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अकोला यांनी  गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे स्थानीक गुन्हे शाखा, अकोला चे स्था.गु.शा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळेक यांना सुचित केले. पो.नि शंकर शेळके यांनी स्थागुशा येथील एक पथक नेमले. पथकास गुन्हा उघडकीस आणण्या बाबत योग्य मार्गदर्शन केले. तपास पथकाने पो. नि शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास करीत असता, त्यांना तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहीतीच्या आधारे माहीती मिळाली की, परराज्यातील लोक हे अकोट फाईल अकोला येथील भोईपुरा येथे भाडयाने राहत आहे. अशी खात्री लायक बातमी प्राप्त झाल्यावरून सदर माहीती पो.नि.सा स्था.गु.शा. अकोला यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेले माहीती प्रमाणे सदर ठिकाणी पथक गेले. 



पथकास सदर घरात मुन्नीयप्पम कुप्पम (रा. युडीयाराजप्पालायम, अंबुर, थोटटालम, वेल्लोर तामीळनाडु), शिवा मुन्नीअप्पन (रा.युडीयाराजप्पालायम, अंबुर, थोटटालम, वेल्लोर तामीळनाडु), चिन्ना नारायणा ( रा. टीटी मोत्तुर, उटटरपलायम गुडीयटटम ता. थोटीथोरीयममुटटर, वेल्लोर, तामीळनाडु), व्यंकटेश नारायण शिवा (वय 35 वर्षे रा.टीटी मोत्तुर, उटटरपलायम गुडीयटटम ता. थोटीथोरीयममुटटर, वेल्लोर, तामीळनाडु) असे सांगितले. 




पोलिसांना आरोपीतांचे वागणूक संशास्पद वाटल्याने त्यांना विश्वासात घेवून विचापूस केली. यावेळी त्यांनी सकाळी अकोला शहरातील अपार्टमेंट मध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचापूस केली. त्यांनी चार नग पिवळ्या धातुचे (सोन्याचे) हातातील अंगठया वजन अंदाजे 20 ग्रॅम किं. 1,20,000/- आणि तीन मोबाईल फोन किंमत अंदाजे तीस हजार असा एकुण 1,50,000 रूपये चा फिर्यादीत नमुद केलेला 100 टक्के मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन रामदास पेठ, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले होते.



दरम्यान, सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपीं तर्फे न्यायालयात ॲड. प्रफुल सुरवाडे यांनी बाजू मांडून सर्व आरोपींची कारागृहातून अटी व शर्तीवर सुटका करण्यात आली, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

टिप्पण्या