sport-wrestler-siddhant-gavai: पैलवान सिद्धांत गवईची सलग चौथ्यांदा अमरावती विद्यापीठ कुस्ती करिता निवड




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे अमरावती विद्यापीठ अंतर्गत झालेल्या कुस्ती स्पर्धेत अकोल्याचा पैलवान सिद्धांत गवई याने 125 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. चंदूदादा श्रावण सिरसाट यांचे मार्गदर्शन मध्ये पैलवान सिध्दांतचे कुस्ती प्रशिक्षण सुरू आहे. सिद्धांत हा राष्ट्रिय कुस्तीपटू संतोष गवई (पहिलवान) यांचा सुपुत्र आहे. 



संतोष गवई हे पोलीस दलात हवालदार पदावर पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे नेमणुकीस आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातून अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अनेक कुस्ती स्पर्धा गाजविल्या आहेत. 



पैलवान सिद्धांत गवई आपल्या यशाचे श्रेय आई वडील, चंदूदादा सिरसाट यांना देतो. 




सिद्धांतचे यशाबद्दल पैलवान रवी मुळे, पैलवान गट्टू पाचपोर, विलास बंकावार, उमेश पाटील सामजिक कार्यकर्ते रवि शिंदे,नगरसेविका चांदणी शिंदे यांनी कौतुक केले.


टिप्पण्या