- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sonala-balapur-constituency: बाळापूर मतदार संघातील सोनाळा वासीयांचा मतदानावर बहिष्कार; सर्वपक्षीय नेते व उमेदवारांना गावात ‘नो एंट्री’
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*सोनाळा येथील मतदारांनी महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला
*मूलभूत सुविधांपासून वंचित
*पुलाची उंची वाढविण्याची मागणी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच स्थानिक पायाभूत विकासाच्या प्रश्नावर शासनाचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी काही गावांमध्ये निवडणूक मतदानावर बहिष्कार घातला जात असल्याचे समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातील सोनाळा येथील मतदारांनी महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतरही देशातील अनेक गाव मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. सरकार कोणाचंही येवो या गावातील समस्या कायम आहेत. त्यातीलच एक गाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील सोनाळा.
सोनाळा हे गाव बाळापुर मतदार संघात असून, बाळापुर विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाचे नितीन देशमुख हे आमदार आहेत. सुमारे 1000 लोकवस्तीच्या या गावात सुमारे 700 मतदार आहेत. स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटूनही गावाजवळून जाणाऱ्या पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीकडे सतत येथील आमदारांनी पाठ फिरवली आहे. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आजपर्यत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने शेवटी सोनाळा वासियांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे गावकरी विष्णु अरबट यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचा फलक देखील गावाच्या प्रवेशद्वारात लावला आहे. तर अनेक वर्षांपासून पुलाची उंची वाढवण्याची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांनी आता सर्वपक्षीय नेत्यांना मत मागण्यासाठी गावात ' नो एन्ट्री ' चा इशारा देखील दिला असल्याचे गावकरी नरेंद्र अरबट सांगतात.
सोनाळा गावा जवळून वाहत असलेल्या मोर्णा नदीच्या पुलाची उंची कमी आहे. यामुळे गावातील आणि या मार्गावरील गावातील प्रवाशांना पावसाळ्यातील चार महिने जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो. गावातील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पासून शिक्षणासाठी 4 किलोमीटरवर असलेल्या अंदुरा या गावाला याच पुलावरून जावं लागते. पावसाळ्याच्या दिवसात नदीचे पाणी या पुलावरून वाहत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. आता पुलाची उंची वाढवण्याची मागणी विद्यार्थी सुद्धा करत असल्याचे. विद्यार्थिनी शिवानी कुरवाळे म्हणाली.
मतदान हा सर्वांचा हक्क आहे, मात्र या गावकऱ्यांनी असुविधांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांच्या या समस्येकडे शासन लक्ष देऊन यांची मनधरणी करून मतदान करण्यासाठी पुढाकार घेणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा