samrat-dongardive-murtijapur: मूर्तिजापुर विधानसभा मतदार संघात हजारोंच्या साक्षीने सम्राट डोंगरदिवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात एकच लाट गोरगरीबांचा हक्काचा "सम्राट"






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा अकोला पश्चिम हा उमेदवार निवडीसाठी प्रलंबित वगळता सर्व जागेचा तिढा सुटला आहे. आज महाविकास आघाडीकडून अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) यांनी सर्वप्रथम आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 




मूर्तिजापूरात सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दहा वर्षापासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या रवी राठी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वंचितकडून सुगत वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आज दुपारी महायुती कडून विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात काट्याची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.




दरम्यान आज महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या प्रश्नांना घेऊन आपण निवडणूकीला सामोरे जात असल्याचं म्हटलं आहे. समोर कितीही मोठी धनशक्ती असली तरी ही निवडणूक जनतेने हातात घेतली असल्याने आपला विजय पक्का असल्याचा दावाही महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी यावेळी केला. गोर गरीबांच्या हक्कासाठी काम करंत राहणे हेच मी माझ्या आयुष्याचे ध्येय मानत आलो आहे. आणि त्याच कष्टकरी बांधवांचा आवाज बनुन विधानसभेत जाण्याचा माझा मानस असल्याचे याप्रसंगी सम्राट डोंगरदिवे म्हणाले. 



 गोरगरीबांचा हक्काचा "सम्राट"


यावेळी महविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या एतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने सम्राट डोंगरदिवे यांचा चाहता वर्ग आणि पाठीराखे या मिरवणुकीत सामील झाले होते. मूर्तिजापुर विधानसभा मतदार संघात एकच लाट गोरगरीबांचा हक्काचा सम्राट…अशा घोषणांनी मिरवणुक मार्ग दणाणून गेला होता.






टिप्पण्या