- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
poonam-mahajan-bjp-appeal: विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देवून जनसंपर्क अभियान राबवावे- पूनम महाजन यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: समाज आणि राष्ट्र सोबत मानवता व संस्कृती, संवर्धन एकता व परंपरा कायम राखण्यासाठी या देशाची ओळख राखण्यासाठी आपण सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने मतभेद विसरून एक मोठ्या उद्देशाने एकत्रित येणारे कार्यकर्ते असून समाज व राष्ट्र समर्पित कार्यकर्त्यांनी विरोधकांचा नकारात्मक अपप्रचाराला उत्तर देऊन जनसंपर्क अभियान राबवावा, असे आवाहन माजी खासदार पूनम महाजन यांनी केले.
स्थानिक ग्रीनलँड कॉटेज येथे भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर होते. मंचावर खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, जयंत मसने, अर्चना मसने, चंदा शर्मा, माधव मानकर, एडवोकेट देवाशिष काकड, सिद्धार्थ शर्मा, एडवोकेट सुभाष ठाकूर, संजय गोटफोडे, कृष्णा शर्मा, हरीश आ प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संवाद साधून जुन्या गोष्टींना उजाळा दिला. महायुतीच्या कामकाजाची माहिती देऊन केवळ 45 दिवस पक्षासाठी देऊन महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेच्या विकासासाठी आपण भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला विजयी करा. यावेळी त्यांनी अनुप धोत्रे यांचे सुद्धा अभिनंदन केले. स्वर्गीय गोवर्धन शर्मा व माजी खासदार संजय धोत्रे यांच्या कार्याची सुद्धा त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले. यावेळी महानगर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा