- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
police-memorial-day-2024-akl: पोलीस स्मृती दिनाचे निमित्याने शाहिद हुतात्म्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पोलीस मुख्यालय अकोला येथे आज 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनाचे निमित्याने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांनी शहीद हुतात्मा स्मारकला पुष्पचक्र अर्पण करून शाहिद जावनांना श्रद्धांजली दिली.
त्यावेळी पोलीस स्मृती दिनाचे महत्व विषद करतांना, कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासना तर्फे 21 ऑक्टोबर हा दिवस 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो. 21 ऑक्टोबर, 1959 रोजी लडाख हद्दीत भारत तिबेट सिमेवर 16 हजार फुट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाची 10 शिपायांची तुकडी गस्त घालीत असता अकस्मात त्यांच्यावर हमला झाला, हमल्याची चाहूल लागताच सिमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रास्त्रे याची पर्वा न करता 10 पोलीस जवान प्राणपणाने लढले व मातृभुमीच्या रक्षणार्थ या शूरवीरांनी मोठ्या संख्येने असणाऱ्या शत्रूशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. हॉटस्प्रिंग येथे ज्या ठिकाणी या शूरवीरांनी प्राणार्पण केले तेथे संपूर्ण भारतातल्या पोलीसांनी या वीरांचे स्मारक उभारले. हॉटस्प्रिंग च्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस "ह्तात्मा दिन' म्हणून पाळला जातो व दरवर्षी आपले कर्तव्य बजावीत असतांना बलिदान देणाऱ्या व विरगती प्राप्त करणाऱ्या सर्व पोलीस हुतात्म्यांना साऱ्या भारत देशातील पोलीस दल मानवंदना देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येते असे सांगितले.
त्यानंतर बंदुकीच्या फेरी झाडून व शाहिद झालेल्या जवानांच्या नावाचे वाचन करण्यात आले, भारतातून एकूण 216 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावीत असतांना आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 01 पोलीस अधिकारी 2 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
श्रद्धांजली पर कार्यक्रमाला अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला, सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला, आनंद महाजन प्रभारी पोलीस उपधीक्षक (गृह), तसेच शहरातील तसेच शाखा प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
शाहिद जवानांचे नावाचे वाचन पोउपनिरीक्षक संभाजी हिवाळे, पोउपनिरीक्षक करुणा माद्दे यांनी केले, कार्यक्रम नियोजन गणेश जुमनाके राखीव पोलीस निरीक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा