- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
pdkv-daily-labor-block-road-: कृषि विद्यापीठातील रोजंदार मजुरांनी वणीरंभापुर जवळ रोखला रस्ता; आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, रवी राठी यांच्या नेतृत्वात आंदोलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील pdkv रोजंदारी मजूरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आपल्या विविध मागण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वणीरंभापुर जवळील राष्ट्रीय महामार्गावर national highway क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले. महिला मजुरांसह शेकडो मजूर या आंदोलनात सहभागी झाले होते.
रवी राठी यांच्या नेतृत्वात आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते रवी राठी ravi rathi यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. याआधी मजुरांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तोडगा काढण्याचा आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले होते. मात्र, मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावरही यावर कोणताही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने आज शेकडो शेतमजुरांनी हा रस्ता रोको आंदोलन केले.
BAnews24
या आहेत मागण्या
विद्यापीठाच्या प्रत्येक विभागावर मजुरांना बारमाही काम देण्यात यावे, शासनाने बंद केलेली कंत्राटी पध्दत बंद करण्यात यावी. किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन-2014 च्या शासकीय नियमानुसार वेतनामध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. marathi news
महामार्गावर वाहनांच्या रांगा
महामार्गाच्या दोन्ही बाजूने मजुरांनी रस्ता जाम केला होता. दरम्यान या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या.
सौम्य लाठीचार्ज
सुमारे दोन तास सुरू असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत, सौम्य लाठीचार्ज soft lathicharge करुन आंदोलन मोडून काढले. पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी राज्यसरकारने दडपशाही करून हे आंदोलन मोडून काढला असल्याचा आरोप शेकडो आंदोलकांनी केला.
रवी राठी आपल्या भूमिकेवर ठाम
जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार, अशी ठाम भूमिका यावेळी रवी राठी यांनी घेतली होती. यावेळी पोलिसांनी रवी राठी यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र रवी राठी आपल्या भूमिकेवर ठाम होते.
agriculture
Blocked
Daily laborers
national highway
protesters
Ravi Rathi
Soft lathicharge
University
Vanirambhapur
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा