- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
murder-case-balapur-river-: पोटच्या मुलींना बापाने भिकुंडनदीत जिवंत फेकले; दोन्ही बहिणीचे मृतदेह बचाव पथकाने शोधून काढले
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची जिगरबाज कामगीरी नदीत बेपत्ता असलेल्या दोन्ही बहिणींचे मृतदेह रात्रीच शोधुन बाहेर काढून दिलेत.
“मनाला सुन्न करणारी घटना आहे ही अशा घटनांना आळा घालण्यासाठी यशस्वी समाज व्यवस्थापन तसेच यशस्वी कुटुंब व्यवस्थापन गरेजेचे आहे ही जबाबादारी समाजातील प्रत्येक नागरीकांची आहे.”
दीपक सदाफळे
जिवरक्षक
तथा
आपत्ती व्यवस्थापन निवारण विभाग
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पोटच्या मुलींना बापाने भिकुंडनदीत जिवंत फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. मुलींना नदीत फेकल्याची आरोपी बापाने कबुली दिल्यानंतर दोन्हीं बहिणींचे मृतदेह शोध मोहीम सुरू झाली होती. अखेर पिंजर येथील बचाव पथकाने दोन्ही चिमुकल्या बहिणींचे मृतदेह शोधून बाहेर काढले.
चार ऑक्टोंबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्य़ातील बाळापुर येथील सहा नंबर नॅशनल हायवे वरील पुलाखाली भिकुंडनदी पात्रात बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यातील कदमापुर येथील शे.हारुन शे.शब्बीर यांनी आपल्या आलीया आणी सदप या अंदाजे सात आणी नऊ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना खोल नदीत एकाच वेळी दोन्ही मुलींना जिवंत ढकलून दिल्याची कबुली आरोपी वडीलाने पोलीसांना दिली पासुन स्थानिकांकडून शोध मोहीम चालु होती. परंतु काहीच मिळुन आले नसल्याने बुलाढाणा जिल्हाधीकारी कीरण पाटील आणी बाळापुर उ.वि.पो.अ.विनोद ठाकरे बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अनिल जुंमळे स्था.गु.शा. बुलढाण्याचे अशोक लांडे सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करत लगेचच दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफळे, शेखर केवट, मयुर कळसकार, विष्णु केवट,शिवम वानखडे,अश्विन केवट, विकी गाडगे,गौरव गाडगे, प्रतिक बोरसे यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळावर पोहचले. लगेच आत जाऊन सिन ट्रेस केला असता, जागेवर नदी पात्रात खोल पाणी आणि सेंटरला तळात गणपती मूर्तीचे ढाचे व दगड, लोखंडी राॅड असल्याचे ट्रेस झाले. दोन तास पथकातील पाच एक्सपर्ट स्विमर यांनी साखळी पद्धतीने अंडर वाॅटर सर्चिँग चालु केले. तरी काहीच मिळुन आले नाही शेवटी रात्री नऊ वाजता घटनास्थळावरून पुढे रेस्क्युबोटीने सर्च ऑपरेशन करत असताना घटनास्थळावरून एक.मी. अंतरावर एक आणी तेथुन पुढे 100 मीटर अंतरावर दुसरा असे दोन्ही बहीणींचे मृतदेह पाच ऑक्टोंबर रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास शोधण्यात पथकास यश आले. दोन्ही मृतदेह पोलीसांच्या ताब्यात दीले तेव्हा नातेवाईकांनी पंचा समक्ष दोन्ही बहीनींचे मृतदेह ओळखले.
विशेषत घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बुलढाणा विश्व पानसरे, डिवायएसपी विनोद ठाकरे , खामगाव, डिवायएसपी बाळापुर गजानन पडघन ,स्थानिक गुन्हेशाखा बुलढाणाचे पो.नि.अशोक लांडे, बाळापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.अनिल जुमळे ,पो.नि.ग्रामीण खामगावचे व्यंकटेश आलेवार ,एपिआय रवी मुंडे ,एपिआय चेचेरे ,डीएसबीचे पिआय अंबुलकर ,पिएसआय पुसाम ,पोलीस कर्मचारी कैलास चव्हाण ,बाळकृष्ण फुंडकर ,संजय काकडे, पो.काॅ.राजेंद्र टेकाडे, नितेश राठोड , मुकेश इंगळे,तसेच बुलाढाणा खामगाव पोलीस आणी बाळापुर पोलीस घटनास्थळावर पुर्ण वेळ उपस्थित होते. येथील सामाजिक कार्यकर्ते टील्लु ठाकुर तसेच नातेवाईकांसह बाळापुर येथील नाग राज हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा