mla-randhir-savarkar-appeal: नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे- आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नवरात्राच्या पर्वावर दोन गटांमध्ये वाद होणे ही दुर्दैवापासून वेदनादायी असून दोन्ही समाजाने संयम ठेवून एकमेकांच्या भावनेचा आदर करण्याची गरज असून निरपराध नागरिकांवर सातत्याने असा प्रकार होणे चुकीचा असून पोलिसाने अशा तत्त्वांचा शोध घेऊन ताबडतोब कारवाई करावी तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व शहराची परंपरा संस्कृती कायम ठेवावी व नवरात्र व दिवाळी, धम्मचक्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरी करावे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. 


हरिअर पेठ भागामध्ये घटना घडल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पोलीस प्रशासनाशी संवाद साधून राज्याचे गृहमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेची माहिती दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना माहिती देऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग तसेच शहर सहायक पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. 




यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते यांची भेट सावरकर यांनी घेतली. जखमींची विचारपूस केली. 




शहरात वारंवार अशा घटना का घडत आहे या संदर्भात पोलिसांनी योग्य तो तपास करावा. तसेच सणवार मध्ये असे प्रकार घडता कामा नये, या दृष्टीने दोन्ही समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. अकोला शहरांमध्ये आपल्याला एकत्रित राहायचं आहे याचा विचार करून कार्य करावे. महाराष्ट्राची संस्कृती अकोल्याची संस्कृती कायम ठेवावी. निरपराध व्यक्तींवर कारवाई करता कामा नये, असेही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. 



आमदार सावरकर यांनी यावेळी शिवसेना वसाहत, हरिअर पेठ, गाडगे नगर,  भांडपुरा या भागात पाहणी केली. तसेच शिवनगरतील कार्यकर्त्यांची चर्चा केली. सामाजिक हित लक्षात घेता छोट्या मोठ्या वादाना खतपाणी न घालता संयमाने कार्य करा, असे  आवाहन त्यांनी यावेळी केले.

टिप्पण्या