mdf-meeting-yogendra-yadav: महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमच्या विचार सभेत अविचारी कृत्य; योगेंद्र यादव यांनी हल्ल्याचा केला निषेध,अकोल्यातील घटना




ठळक मुद्दा 

खुर्च्यांची तोडफोड, फेकाफेक आणि हाणामारीने सभा गाजली 






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम द्वारे अकोल्यात आज विचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुस्लिम समाजाला सोबत घेऊन महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आली. मात्र या सभेत सभा संयोजकांचे भाषण सुरू असताना काही मुद्यावरून खडाजंगी होवून खुर्च्यांची तोडफोड, फेकाफेक व हाणामारीचा प्रकार झाल्याने सभा अर्धवट राहिली.




महायुतीच्या विरोधात असलेल्या या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच त्यांना काही प्रश्न उपस्थित केले. वक्फ बोर्डच्या कायद्याच्या वेळी राहुल गांधी अनुपस्थित का राहिले ? तर येणाऱ्या निवडणुकीत किती मुस्लिमांना उमेदवारी देणार ? तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी सोबत का घेलता जात नाही? हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी या सभेत जोरदार गोंधळ झाला.



योगेंद्र यादव यांनी केला हल्ल्याचा निषेध 


अकोल्यात आज महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम तर्फे विचार मंचचा आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून भारत जोडो यात्रेचे संयोजक योगेंद्र यादव हे उपस्थित होते. यावेळी सभेत उपास्थित काही लोकांनी या सभेत गोंधळ घालत प्रचंड नारेबाजी करत खुर्च्यांची फेकाफेक करत योगेंद्र यादव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  



या हल्ल्याचा योगेंद्र यादव यांनी निषेध केला. सभेत उपास्थित काही लोकांकडून गोंधळ घालणारे लोक हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असल्याचं समजते,असे यादव यांनी माध्यमांना सांगितले . तर हल्लेखोरांनी हा हल्ला आपल्यावर न करता संविधानावर केला असल्याचंही ते म्हणाले. या हल्ल्या मागे वंचित बहुजन आघाडी असल्यास प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा खाली पाहावं लागलं,असे देखील यादव म्हणाले.



मात्र, या संपूर्ण प्रकरणात वंचितचे कार्यकर्ते नव्हते, असं वंचितने स्पष्ट केलं आहे.



टिप्पण्या