marathi-actor-atul-parchure-: अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड







भारतीय अलंकार न्यूज 24
मुंबई : मराठी नाटक चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचे आज निधन झालं. त्यांच्या त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे.

अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळालं होतं.

अतुल परचुरे मिश्किल अवखळ चेहरा आणि त्यामागे एक खोल विचारी असा माणूस. मराठी बरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी देखील चांगलीच गाजवली. त्यांची जागो मोहन प्यारे ही मालिका खुप गाजली होती. कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तुझं आहे तुजपाशी अशा नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. यामध्ये त्यांच्याबरोबर सुबोध भावे, आनंद इंगळे, उमेश कामत, श्रुती मराठे, मुक्ता बर्वे असे अनेक दिग्गज कलाकार होते.

टिप्पण्या