भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविजय होणार, या विजयाचे शिल्पकार व या विजयामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंपर्क करण्यासाठी कार्यरत व मोठे लक्ष देऊन आपण निवडणुकीमध्ये असून 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला विजयी करा, असे आवाहन मध्यप्रदेशचे पर्यटक मंत्री नामदार विश्वास सारंग यांनी केले.
स्थानिक भाजप कार्यालयात अकोला पूर्व अकोला पश्चिम कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर पाटील होते तर मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, अकोला पश्चिम प्रभारी बाबूलाल महाजन, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने, विजय अग्रवाल, संजय गोटफोडे आदी विराजमान होते.
यावेळी नवरात्र परवावर पर्व ऊर्जा शक्ती भक्ती सोबत आराधनेचा काळ असून विजयादशमी हा विजयाचा उत्सव असून या उत्सवाचा लाभ घेऊन संकल्प घेऊन महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करून प्रभू रामचंद्राचे मंदिर निर्माण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला विजयी करा, अशी ही नामदार विश्वास सारंग मी विचार व्यक्त करून अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्याची प्रमुख म्हणून प्रवासी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी असून त्यांनी संघटनात्मक बाजूचा आढावा घेतला.
यावेळी आमदार सावरकर यांनी, बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी समाजातील सर्व घटकांची संपर्क साधा, महायुतीने मातृशक्तीसाठी अडीच कोटी लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ मिळवून दिला. एसटीमध्ये सवलत दिली. आपल्या दाखल्यामध्ये आईचं नाव टाकून शक्तीचा सन्मान केला. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना व सर्वात जास्त देशाच्या इतिहासामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्याला मदत केली. उपकार केले नाही, परंतु स्वतःला हिंदुत्व म्हणून लिहून घेतात व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेतात त्यांनी काय केले, याचा मतदारांनी विचार करावा. धर्म आणि संस्कृती सोबत विकासचे काम केले. छोट्या छोट्या समाजासाठी महामंडळ निर्माण केली. ब्राह्मण समाज, सोनार समाज, बारी समाज, वारीकर, लिंगायत समाज महामंडळ स्थापना केली. कोतवाल होमगार्ड आशा वर्कर यांना मानधनामध्ये वाढ करून काम करणाऱ्यांचा सन्मान केला. केवळ गप्पांचा बाजार न करता दळणवळणाची सोय सोबत मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिली. लहुजी साळवे, संभाजी महाराज, सावता माळी यांचे स्मारक उभारण्याचं काम महायुती घेतलेली आहे. आपण याचा सर्व प्रचार प्रसार करावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी बाबूलाल महाजन यांनी मध्यप्रदेश निवडणुकीमध्ये प्रचाराचे तंत्र समजून सांगितले. आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल यांचे समोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा