- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mah-assembly-election-date: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली.यावेळी महाराष्ट्र व झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली असून, राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. 30ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीसाठी 4 नोव्हेंबर ही अखेरची तारीख असेल. तर 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. महाराष्ट्रात तरुण मतदारांची संख्या 1.85 कोटी आहे. तर राज्यात 20.93 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
(Images :ECI X social media handel)
निवडणुक तारीख
महाराष्ट्र
विधानसभा
Assembly
Election Commissioner
election date
Maharashtra
Rajiv Kumar
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा