first-list-announce-shiv-sena-: शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर; आमदार नितीन देशमुख व गोपाल दातकर यांना यादीत स्थान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2024 करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे.  अकोला पूर्व मधून गोपाल दातकर तर बाळापुर मध्ये विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी या पहिल्या यादीत स्थान मिळविले आहे.



शिवसेना ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीत बाळापूर मधून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला पूर्व मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बाळापुर आणि अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी मध्ये जागा साठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, आता या दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने या दोन्ही जागा सोडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 



गोपाल दातकर हे अकोला पूर्वकरिता 28 ऑक्टोबर नामांकन अर्ज भरणार आहेत. तर बाळापुर मतदार संघासाठी नितीन देशमुख 29 ऑक्टोबरला शक्ती प्रदर्शन करून आपलं नामांकन अर्ज भरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




अशी आहे यादी



टिप्पण्या