- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कन्फेक्शनरीच्या व्यवसायातून मालाच्या बदलात देण्यात आलेला 34 हजार रुपयांचा धनादेश बँकेत पुरेशा निधी अभावी वटवल्या जाऊ शकला नाही. सबब या धनादेश अनादर प्रकरणात धनादेश देणाऱ्या व्यक्तीस तीन महिन्याचा कारावास व 54 हजार रुपये तक्रारकर्त्यास अदा करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.
सिंधी कॅम्प येथील पक्की खोली येथील व्यापारी मुकेश धनवाणी यांनी धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयात कन्फेशनरीचे व्यापारी आदर्श कॉलनी येथील व्यापारी हरीश भाटिया यांच्या विरोधात सन 2020 मध्ये खटला दाखल केला. ॲड. इलयास शेखानी यांनी प्रकरण दाखल केले. हरीश भाटिया यांनी मुकेश धनवाणी यांच्याकडून कन्फेक्शनरीचे 34 हजार रुपयांचे साहित्य खरेदी करून त्यांना तितक्याच रुपयांचा धनादेश दिला. मुकेश धनवानी यांनी तो आपल्या खात्यात लावला असता तो धनादेश पुरेशा निधी अभावी परत आला. यासंदर्भात धनवानी यांनी अनेक वेळा भाटिया यांना 34 हजार रुपये देण्याची विनंती केली. मात्र भाटिया यांनी वरील रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आपण सामन खरेदी केल्याची बाब ही नाकारली.
यानंतर धनवानी यांनी 6 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट1881 नुसार 138 अन्वये क्षतीपूर्ति साठी दावा दाखल केला. 6 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.एस. खांडबहाले यांच्या न्यायालयात यावर सुनावणी झाली. उभय पक्षाची बाजू ऐकून घेत या सुनावणीत तथ्य व प्रकरणाच्या संदर्भात यातील आरोपी हरीश भाटिया हे दोषी आढळून आले. सबब त्यांना न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात तीन महिने कारावास व 54 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदार मुकेश धनवाणी यांच्या वतीने या खटल्यात ॲड. इल्यास शेखानी यांनी बाजू मांडली त्यांना ॲड. प्रगती मेश्राम यांनी सहकार्य केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा