campaigning-akl-bjp-mahayuti: महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. नरेंद्र मोदी येणार राजराजेश्वर नगरीमध्ये!

   file photo 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले पक्ष महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 किंवा 13 नोव्हेंबर रोजी राज राजेश्वर नगरीमध्ये येत असून, पश्चिम विदर्भाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत, अशी माहिती भाजपा अधिकृत सूत्रांनी दिली आहे.


याशिवाय केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, स्टार प्रचारक आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वा शर्मा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण, पंकजा मुंडे यांच्या सभा अकोला लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. 



यादृष्टीने महायुतीच्या तर्फे जय्यत तयारी सुरू आहे. अकोल्यात पंतप्रधानांच्या सभेच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी सभासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे वेगवेगळ्या जबाबदाऱ्याचे वाटप करण्यात आले असल्याचे समजते.

टिप्पण्या