balapur-constituncy-vba-cong: नतिकोद्दिन खतीब वंचित बहुजन आघाडीत; अन् बाळापूर मतदार संघाचं राजकिय समीकरण बिघाडीत

 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ॲड. नतिकोद्दिन खतीब यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्या नंतर अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचं राजकिय समीकरण बिघडले आहे. VBA मध्ये प्रवेश घेतल्यानंतर ॲड. खतीब यांनी काँग्रेस विरोधी वक्तव्य केल्याने येथील राजकिय वातावरणही चांगलच तापले आहे.


खतीब यांच्या वंचित प्रवेशाने काँग्रेसला या ठिकाणी मोठा धक्का बसला आहे. खतीब यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेसनेही त्यांना प्रतिउत्तर दिला आहे काँग्रेसची बदनामी टाळा अन्यथा घरासमोर आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी खतीब यांना दिला आहे. तसेच खतीब यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांचे पैसे बुडवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, आणि पथसंस्थेचे तेच भागीदार त्यांना येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देतील असेही काँग्रेसने म्हटलं आहे.


काँग्रेस नेते प्रकाश तायडे आणि साजिद खान पठाण यांनी यासंदर्भात काँग्रेसची भूमिका मांडत प्रसार माध्यमांसमोर व्यक्त झाले.

टिप्पण्या