balapur-constituency-VBA-akl: बाळापूर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली; नतीकोद्दिन खतीब यांना उमेदवारी जाहीर, काँग्रेसला ‘जोर का धक्का धीरे से’



ठळक मुद्दा

*वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून खतीब सैय्यद नातीकोद्दीन यांना उमेदवारी जाहीर 

*मुंबई येथे पत्रकार परिषदेत घोषणा 

*  मुस्लिम नेत्यांनी काँग्रेसला केला bye - bye 







भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: काँग्रेसच्या मवाळ हिंदुत्वावर असंतुष्ट, ज्येष्ठ नेते खतीब सय्यद यांच्यासह अन्य 9 मुस्लिम नेत्यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. मुस्लिमांचा सहभाग आणि समानतेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.


दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघातून काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ॲड.नतीकोद्दिन खतीब यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला असल्याने अकोला काँग्रेस मध्ये मोठे भगदाड पडले.खतीब यांनी यावेळी काँग्रेसमध्ये राहून समाजाला न्याय देता येत नसल्याची खंत व्यक्त केली. 





खतीब यांच्या या प्रवेशानंतर आता बाळापूर मतदार संघाचं राजकिय समीकरण पूर्णतः बदलल आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे नितीन देशमुख आमदार आहेत. तर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने आणि नतीकोद्दिन खतीब यांचा सर्वधर्मीय मध्ये असलेल्या संपर्कमुळे वंचित बहुजन आघडीची या ठिकाणी ताकद वाढली आहे. तर बाळापूर विधान सभे करिता वंचित बहुजन आघाडी तर्फे नतीकोद्दिन खतीब यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.



वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक 2024 साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार.




टिप्पण्या