baba-siddiqui-shot-dead-case : बाबा सिद्दिकी यांची हत्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - प्रकाश आंबेडकर

file photo 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निषेध व्यक्त केला. बाबा सिद्दिकी यांना पोलीस सुरक्षा असूनही त्यांची हत्या करण्यात आली यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.

प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


आयराम गयाराम यावर येऊन हे राजकारण थांबलेलं असून कुठेही नीतिमत्ता राहिलेली नाही नसल्याचं ही आंबेडकर म्हणाले.



माणसे जगली की मेलीत याच्याशी संबंध नाही आपली सत्ता मात्र कायम राहिली पाहिजे म्हणत आंबेडकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नांवरून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला हवा, तरच विश्वास निर्माण होईल, असं ही ते म्हणाले.


अकोल्यात आयोजित धम्म मेळावा निमित्त ॲड. प्रकाश आंबेडकर अकोल्यात आले आहेत. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

टिप्पण्या