baba-siddique-shot-dead-ncp: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या; दोन आरोपींना अटक

(all file picture)


भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबई: राजकीय विश्वातून धक्कादायक बातमी येत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या करण्यात आली आहे.

मुंबईतील वांद्रे भागात त्यांच्यावर एका अज्ञात इसमाने हल्ला करत गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बाबा सिद्दीकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी चालू आहे. बाबा सिद्दिकींवर कोणत्या कारणाने आरोपीने गोळी झाडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा  मृत्यु झाला. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. 



आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.




बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवासांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. 


लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचून  तपास सुरू केला आहे. 




बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केलं आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.




एका घड्याळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा ते एक दिग्गज नेता असा बाबा सिद्दीकी यांचा थक्क करणारा प्रवास होता. 


सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यात समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी हे सर्वात आधी चर्चेत आले होते. कारण त्यांच्याच इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडच्या या स्टार्सचा समेट झाला होता. तेव्हापासून बाबा सिद्दीकी यांना राजकीय क्षेत्रात विशेष स्थान मिळाले.





बाबा सिद्दिकी हे 1977 साली NSUI मुंबईचे सदस्य झाले. 1980 साली त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि 1982 साली अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मुंबई महापालिकेत प्रवेश झाला.


मुंबई महापालिकेत त्यांनी स्वत:ला प्रस्थापित केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले. 2004 ते 2008 या काळात ते मंत्रीही होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकींचा पराभव झाला होता. सध्या त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी या जागेवरून आमदार आहे.


सुरुवातीपासूनच वांद्रे हे बाबा सिद्दीकी यांचं राजकीय कार्यक्षेत्र राहिलं आहे. ते ज्या भागातून नेतृत्व करतात तेथे मोठ्या प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. त्यामुळे जेव्हा ते राजकारणात आपले पाय रोवत होते. त्यावेळी त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली. 


सुनील दत्त यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांची संजय दत्त याच्याशी ओळख झाली आणि अल्पावधीतच बाबा सिद्दीकी हे संजय दत्तच्या निकटवर्तींयांपैकी बनले. सुरुवातीला संजय दत्त आणि सलमान खान हे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे संजय दत्तने सिद्दीकी आणि सलमान खान यांची भेट घडवून आणली आणि इथूनच बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची कहाणी सुरू झाली. आणि ते इफ्तार पार्टी साठी प्रसिद्ध झाले. कारण अख्खं बॉलिवूड या पार्टी मधे सामील होत होते. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील मैत्री प्रसिद्ध आहे. पुढे बाबा सिद्दीकीं यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जुळल्या गेले. संजय दत्त मुळे देखील बाबा सिद्दीक्की चर्चेत होते. संजय दत्तचे अंडरवर्ल्डशीही संबंध आणि संजय दत्तचे बाबा सिद्दीकी यांची त्यांचाशी असलेली जवळीक यामुळे वारंवार त्यांचं अंडरवर्ल्डशी नाव जोडलं गेलं.



 


मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यात आरोपी म्हणून ज्यांची नावं होती त्यात बाबा सिद्दीक यांचाही समावेश होता.  2017 मध्ये याच प्रकरणाशी संबंधित आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. 



बाबा सिद्दीकी हे केवळ राजकिय नेते नव्हते. तर बॉलिवूडमध्येही त्यांचा  दबदबा होता. आज त्यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली आहे.





टिप्पण्या