assembly-elections-akola-con: भाजप प्रणित महायुतीने राज्याचा बट्ट्याबोळ केला - काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल यांचे वक्तव्य




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भाजप प्रणित महायुतीने राज्याचा बट्ट्याबोळ केला आहे.या महायुतीच्या शासन काळात हे सरकार सर्व आघाड्यावर सपेशल नापास झाले आहे. महायुतीच्या शासनाने शिक्षित लोकांशी गद्दारी केली आहे. शाळा विविध कारणावरून बंद करण्यात येत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत मंत्र असणाऱ्या शिक्षणालाच संपवण्याचा घाट महायुती शासन करीत आहे. इतकेच नव्हे तर भाजप शासनाने मध्यान भोजन, शाळेतील गणवेश, रोजगार आदींवर गदा आणली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे महायुती शासन महिलांसाठी योजनाचा पूर आणीत असून दुसरीकडे राज्याच्या तिजोरीचा ठणठणात झाला आहे. ज्याप्रमाणे सामान्य जनतेचा हाल होत आहे, त्याचप्रमाणे कास्तकारांच्यावर ही महायुतीने संक्रात आणली आहे. सोयाबीन ,कापसाला भाव मिळेनासा झाला आहे ,शासनाच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे.सर्वत्र बेबंदशाही निर्माण झाली असून परिवर्तनाची नांदी घडविण्याची वेळ विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे.विकास प्रेमी जनतेने या नाकर्त्या भाजप महायुतीच्या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री व अकोला विधानसभा निवडणुकीचे काँग्रेसचे विशेष निरीक्षक कमलेश्वर पटेल यांनी केले. 




स्वराज्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर,महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, माजी आ बबनराव चौधरी, डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, बुलढाणा जि प चे माजी अध्यक्ष व सह प्रभारी चित्रांगण खंडारे, प्रशांत प्रधान आदी उपस्थित होते.



काँग्रेस पक्ष नव्या बदलाने या निवडणुकीला सामोरे जात असून तो जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढणार आहे. महानगरातही गत अडीच वर्षापासून मनपा निवडणूक झाली नसून ही लोकशाहीची क्रूर थट्टा असून या माध्यमातून या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी या राजकीय अव्यवस्थेवर कधी आवाज उचलत नाहीत. अकोला मनपाची अडीच वर्षापासून निवडणूक झाली नाही हे मोठे आश्चर्य असल्याचे पटेल यांनी यावेळी सांगितले.



टिप्पण्या