assembly-election-akola-Sena जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्याचा सेनेचा प्रयत्न - गोपीकिसन बाजोरिया यांचे पत्रकार परिषदेत वक्तव्य





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यात आम्ही अकोट आणि बाळापूर या दोन जागाची मागणी केली असून, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याचे पालन करून  जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यास शिवसेना (शिंदे गट) प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी सांगितले.



शिवसेना कार्यालय येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


यावेळी बाजोरिया यांनी महायुतीने केलेल्या विकास कामांचा आढावा घेत शेतकरी, महीला, बालक अश्या सर्वांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना उपक्रम राबविले असल्याचे सांगितले. महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेवून असंख्य योजना सुरू करून विकासाच्या मुख्य प्रवाहात उपेक्षित घटकांना आणायचा प्रयत्न केला आहे, असे बाजोरिया यांनी यावेळी सांगितले. अडीच वर्षांच्या अल्पकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने केलेली जनकल्याण कामे मोठी असून लोकहीत सर्वोपरी हाच विचार घेऊन काम करणारी महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी अपेक्षा बाजोरिया यांनी व्यक्त केली.




अकोला जिल्ह्यात आम्ही अकोट आणि बाळापूर या दोन  जागा मागितल्या आहेत, त्याचा पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याचे पालन करून  जिल्ह्यात सर्व जागा महायुतीच्या निवडून आणण्यास सेना प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी सांगितले.



यावेळी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, संतोष अनासाने, उषा विरक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पण्या