- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
assembly-election-2024-akot: रामप्रभू तराळे यांनी नामांकन अर्ज दाखल केला; अकोटात महाविकास आघाडीलाच शिवसेना ठाकरे गटाचे आव्हान !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोट विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. सध्या भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र त्याआधी त्यांचे तिकीट कटणार का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली होती. आतापर्यंत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढले, त्यामुळे हा मतदार कुणाच्या वाटेवर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही जागा काँग्रेसच्या पदरी पडली. माजी मंत्री सुधाकर गणगणे यांचे सुपुत्र महेश गणगणे यांना उमेदवारी देण्यात आली.
या ठिकाणी शिवसेना सतत निवडणूक लढत आली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी जोरावर होती. येथे महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीला आपल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचा या ठिकाणी आव्हान आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रामप्रभू तराळे यांनी सुद्धा आपला नामांकन अर्ज याठिकाणी भरला आहे. बंडखोर उमेदवार रामप्रभू तराळे यांनी शेकडो समर्थकांसोबत आपला नामांकन अर्ज भरला. शेतकरी पुत्र रामप्रभू तराळे यांनी याठिकाणी घराणेशाहीला विरोध केला आहे.
पक्षश्रेष्ठी कडून बंडखोरी न करण्याकरिता कोणतेही सूचना आली नसल्याचेही तराळे म्हणाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत रामप्रभू तराळे आपल्या निर्णयावर ठाम राहतात का ? याकडे आता मतदारांचे लक्ष लागले. एकंदरीत परिस्थिती पाहता अकोट येथे महाविकास आघाडीत ' ऑल इज वेल ' दिसून येत नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा