- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
assault-case-killa-chowk-crime : किल्ला चौकातील मारहाण प्रकरणात पाच जणांवर गुन्हे दाखल; तिघांना अटक, विना परवाना मोर्चा काढणाऱ्या विरुध्द कारवाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील हरिहर पेठ येथील दंगल प्रकरणातील सहभागी असलेल्या 17 आरोपींना अटक केल्या नंतर काही महिलांनी काल जुने शहर पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. हा मोर्चा परत जातांना दुसऱ्या गटाच्या एका व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल करून मारहाणीत सहभागी 5 पैकी 3 आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध घेत आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न करता शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, 07 ऑक्टोबर रोजी पो.स्टे. जुने शहर हदिदतील हरिहर पेठ येथे झालेल्या जातीय घटनेच्या संदर्भाने झालेल्या घटनेतील आरोपी अटक करणेबाबत काल 09 ऑक्टोबर रोजी करण शाहु याचे नेतृत्वात विनापरवाना मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा हा पोलीस स्टेशन जुने शहर येथे येवुन त्यांनी निवेदन देवुन मोर्चा परत जात असताना, मोर्चा मधील सहभागी लोकांनी घटनेचा राग मनात धरून हरिहर पेठ येथे मोटर सायकलने रस्त्याने जाणारे शेख जमीर शेख उमर यांना मोर्चा मधील इसमांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावरून त्यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पो. स्टे. ला कलम 189 (2), 191(2), 190, 196(1), 296, 118 (1) प्रमाणे करण शाहु, सोनु शाहु, राज यादव, गजु मॅकनिकल, गुंजन पहेलवान व इतर यांचे विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामधील तिन आरोपी अटक करण्यात आले आहेत. तसेच करण शाहू यानी विनापरवाना पो.स्टे. ला मोर्चा आणल्याने करण शाहु विरूध्द तसेच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विरूदध पो.स्टे. ला कलम 221,223, भा.न्या.सं. 135 मुपोअ प्रमाणे गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितिन लेव्हरकर यांनी दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देवु नये व सोशल मिडीयाव्दारे आक्षेपार्ह पोस्ट टाकुन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करू नये. तसेच विनापरवाना मोर्चा,धरणे, आंदोलन रॅली काढु नये. पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे व निर्देशांचे पालन न केल्यास संबधीतांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन अकोला पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा