anonymous-postering-in-akola: विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोल्यात निनावी पोस्टरबाजी; काँग्रेसने व्यक्त केली नाराजी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोल्यात राजकिय कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसने गांधीगिरी करीत यावर पोस्टर द्वारा कुठलेच उत्तर दिलेले नाही. यापूर्वीही सुद्धा काँग्रेस विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. आता पुन्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे.



काय म्हटलं आहे पोस्टर द्वारा



काँग्रेस संविधान वाचवणार कसे ?


जवाहरलाल नेहरूंनी 1951 मध्ये जातीय जनगणनेला विरोध का केला?


इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल 10 वर्ष धूळ खात का पडू दिला?


राजीव गांधीनी मंडळ आयोगाचा अहवाल दुर्लक्ष का केला?


काँग्रेस का हाथ भाजपा के कमल के साथ…


आणि सर्वात शेवटी

' राष्ट्रीय ओबीसी महासंघ ' असा उल्लेख केलेला आहे. 



या पोस्टरबाजी मुळे शहरात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 




तर दुसरीकडे हे पोस्टर नेमके राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लावले आहेत की काँग्रेसला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. 



दरम्यान काँग्रेस विरोधात सुरू असलेल्या पोस्टरबाजीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.




काय म्हणाले काँग्रेस नेते प्रकाश तायडे



अकोल्यात काँग्रेसचा उल्लेख करीत वारंवार जी निनावी पोस्टर्स बाजी सुरू आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. आम्हाला माहीत आहे, ते कोण आहेत. आम्ही त्यांना ताकीद दिली आहे आणि त्यांनी पुन्हा असं होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मात्र, प्रशासनाने देखील याकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या ओबीसी विषय घेवून जे नवीन पोस्टर लागले आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी म्हंटले आहे की, “आमचे सरकार आल्यास आम्ही ओबीसी जनगणना करू.” आमचे सरकार देशात वा राज्यात आले आणि ओबीसी जनगणना झाल्यास तर ओबीसी काँगेसच्या बाजूने उभी राहील. म्हणूनच काहींच्या मनात खदखदत आहे. अशा पोस्टर्स मुळे जिल्हयातील शांतता भंग होईल, त्यामुळे काळजी वाटते. मनपा आणि पोलीस प्रशासनाने या निनावी पोस्टर्स बाजी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी केले आहे.

टिप्पण्या