- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-assembly-election: महाविकास आघाडीचे उमेदवार साजिद पठाण यांनी भव्य मिरवणुकीसह केले नामांकन दाखल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी रात्री साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर झाली. मंगळवारी सकाळी साजिद खान पठाण यांनी भव्य मिरवणुकीसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपले नामांकन अर्ज दाखल केले.
यावेळी डॉ. अभय पाटील, प्रकाश तायडे, अविनाश देशमुख, तश्र्वर पटेल यांच्या सह महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी स्वराज भवन येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी स्वागत करुन विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे उमेदवारी कोणाला मिळणार ? याबाबत उलटसुलट चर्चा शहरात गेल्या तीन दिवसांपासून रंगल्या होत्या. सोमवारी रात्री अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना काँग्रेसने या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुक रिंगणात उतरवले.
गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा अवघ्या 2200 मतांनी निसटता पराभव झाला होता. यावेळी या मतदारसंघात गेल्या एक ते दोन वर्षापासून सुरू असलेले जातीय तेढ त्यातच साजिद यांचे गोवल्या गेलेले नाव यामुळे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी दिल्या जाणार नसल्याची चर्चा पक्षात रंगली होती. मात्र गेल्या 35 वर्षात या मतदारसंघात एवढे मताधिक्य घेणारा एकही उमेदवार नसल्याची बाब पक्षाने हेरत सोबतच साजिद यांचे जमिनीवरील असलेले काम, कार्यकर्ते जपण्याची कला या बाबींचा विचार करत पक्षाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या यादीत साजिद खान यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
मंगळवारी महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत साजिद खान यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी मागील निवडणुकीत आपला 2200 मतांनी पराभव झाला असला तरी या निवडणुकीत आपण 25000 मताधिक्याने निवडणूक जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर ही उमेदवारी आपली नसून ही महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
साजिद यांचे अश्रू अनावर
काँग्रेस पक्षावर आपण आपल्या आईपेक्षा अधिक प्रेम करतो, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवीत मला ही उमेदवारी दिली आपण त्यांचा विश्वास नक्कीच सार्थ करू असे म्हणत साजिद यांचे अश्रू अनावर आले होते. तर यंदा ही पाच वर्षानी येणारी निवडणूक संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मनावर घेतली असून त्यांचे मेहनतीमुळेच आपण या निवडणुकीत जिंकून येवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा