akola-farmers-crop-insurance: पीक वीमा कंपनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घातला घेराव;अद्यापही विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी एचडीएफसी इग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेकडो शेतकरी सामील झाले होते.

खरीप 2023 व रब्बी 2023 -2024 च्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडे नुकसान झाल्याच्या वयक्तिक तक्रारी केल्या होत्या. मात्र कंपनीने त्यांना अद्यापही विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.  


काहींना कमी पैसे देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे कंपनीने पंचनामा केला पण त्याची एक प्रत शेतकऱ्यांना दिली नसल्याचाही आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला. या सर्व मुद्यावर चर्चा करण्यासाठी  शेतकरी गेले असता, कंपनी अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित धोरण अवलंबिले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एच डी एफ सी इग्रो कंपनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. 




मागील वर्षाचे 2023-24 खरीप व रब्बी पीक विम्याचे शेतक-याना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही. तसेच असंख्य शेतक-यांच्या तक्रारी नाकारण्यात आलेल्यां आहेत. तक्रारी ग्राह्य धरून त्यांना नुकसान भरपार्ई मिळावी. ज्या शेतकऱ्याचे पैसे कमी आले आहेत त्या शेतक-यांना माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच ज्या शेतक-यांचे सर्व्हे झाले आहेत, त्या सर्व शेतक-यांना अद्यापर्यत पंचनामा फॉर्म मिळालेले नाहीत. तसेच खरीप 2024 च्या पिक नुकसानीच्या तक्रारी नाकारण्यात आल्या आहेत. त्या ग्राहय धरण्यात याव्यात व पंचनामे झाले नाहीत, पंरतु 10 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असल्यास अशा शेतक-याना 100 टक्के नुकसान ग्राहय धरून मदत देण्यात यावी. या मागण्यासाठी पिक विमा कंपनी एच डी एफ सी इंर्गो कंपनीच्या कार्यालयात शेतकरी संघर्ष समिती अकोला जिल्हाच्या वतीने चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 




आंदोलनात संजय सोनोने, राहुल वानखेडे, रामेश्वर पाटील, रामोरी आगळे, रामदास भगत, सदानंद कवळकर, कुणाल राठोड, पवन निवाने, केशव लळे, रियाजोद्दीन सैय्यद, राहुल वाडकर, शेख मोशिम, संतोष रुद्रकार, शुभम जंवजांळ, श्याम दळवी, आषीश गमे, रमेश चिंचे, श्रीकुमार खोत, धनंजय इंगोले, अमोल डोंगरदिवे, गजानन अटेकार, रामदास सुरूदुशे, यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.



टिप्पण्या