- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-crime-old-city-police-stn: सामुहिक अत्याचार प्रकरण: एका आरोपीस बार्शीटाकळी महान मार्गावरून अटक; दोन दिवसांचा पीसीआर तर आरोपी युवतीची कारागृहात रवानगी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोलाः जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. बहुचर्चित याप्रकरणी आरोपी कुणाल सुनील मनवानी ( वय 24, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प, अकोला) याला बार्शिटाकळी महान मार्गावरून पोलिसांनी अटक केली असून, त्याला मंगळवारी अकोला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अटकेतील आरोपी युवतीला न्यायालय समक्ष हजर केले असता, तिची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा विश्वासघात करून अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले आहे. अल्पवयीन पिडीत मुलगी ही दहावीच्या शिक्षणासाठी अकोल्यात वास्तव्यास आहे. यादरम्यान तिची मैत्री आरोपी युवती सोबत झाली, आणि आरोपी युवतीने पीडित मुलीची मैत्री आपल्या तीन मित्रांसोबत करून दिली. पीडित मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलविण्यात आलं. यानंतर या आरोपींनी शीतपेयच्या नावाने पीडितेला गुंगीचे येण्याचे पेय पाजण्यात आले. त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामुहिक अतिप्रसंग केला. आरोपी युवती आणि तिच्या साथीदाराने याची चित्रफीत तयार केली. या गोष्टीची वाचा कुठं फोडल्यास हा व्हिडिओ व्हायरल करणार, अशी धमकी पीडितेला दिली. यांनतर पीडित मुलीला आरोपींनी वारंवार फोन करून अनैतिक व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुलीने हा प्रयत्न धुडकाडवून लावला होता.
दरम्यान, बुधवार 25 सप्टेंबर 2024 रोजी पीडित मुलीने जुने शहर पोलीस ठाणे गाठून, पोलिसांना आपबिति सांगितली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी लल्ला इंगळे, बंटी सटवाले, एक युवती आणि चिक्की नावाचा आणखी एक अश्या चारही आरोपी विरुद्ध पोस्को सह विविध कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.
पोलिसांनी यातील आरोपी युवतीला अटक केली होती. फरार तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत होते. अटकेतील आरोपी युवतीला न्यायालयासमोर हजर केले होते. तिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपी युवतीला काल न्यायालयासमोर हजर केले असता, तिची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर या प्रकरणात एका आरोपीची वाढ झाली होती. कुणाल मनवानी असे या आरोपीचे नाव असुन सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. इतर आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा