- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sealing-action-three-propertie: थकित करापोटी पुर्व आणि उत्तर झोन येथील तीन मालमत्तांवर सीलची कारवाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये सोमवार 23 सप्टेंबर तोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत आकोट फैल येथील वार्ड क्रं. सी-10 मालमत्ता क्रं. 3557 धा. रामसिंग सोळंके (हुकुम मेरे आका) यांचेकडे 2017-18 ते सन 2024-25 पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 7,41,779/- मालमत्ता कर थकित असल्याने तसेच टिळक रोड येथील वार्ड क्रं. सी-3 मालमत्ता क्रं. 931 धा.कृषीधन सीड्स, अकोला विभागीय कार्यालय यांचेकडे 2017-18 ते सन 2024-25 पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 7,22,440/- मालमत्ता कर थकित असल्याने या दोन्ही प्रतिष्ठानावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
याचसोबत पुर्व झोन अंतर्गत शीवर येथील वार्ड क्रं. ए-10 मालमत्ता क्रं. 257 धा.छाबरा (जुने टोयोटा शोरूम) यांचेकडे 2022-23 ते सन 2024-25 पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,65,890/- मालमत्ता कर थकित असल्याने त्यांच्या प्रतिष्ठानावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहायक आयुक्त विठ्ठल देवकते आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात झाली असून या कारवाईत सहायक कर अधिक्षक हेमंत शेळवणे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, मोहन घाटोळ, स्वाती इंडस्ट्रीजचे प्रोजेक्ट मैनेजर अमित सिंग, विकास शर्मा, अंकुश देशमुख, नितिन इंगळे, नारायण साखरे, मुदस्सीर अमीन, शैलेश गव्हाळे, सचिन कमार आदींची उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करून सील व जप्ती सारख्या अप्रीय कारवाई टाळावे असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे करण्यात आले.
मनपा नगररचना, अनधिकृत/अतिक्रमण विभागाव्दारे शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये सोमवार 23 सप्टेंबर रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गौरक्षण रोड, जठारपेठ, गांधी चौक, डाबकी रोड, खुले नाट्य गृह ते फतेह अली चौक पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करून सामान जप्त करण्यात आले आहे. तसेच दक्षिण झोन अंतर्गत रवि नगर येथील खुल्या भुखंडामध्ये करण्यात आले अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, जीवन मानकीकर, रफीक अहमद, स्वप्नील शिंदखेळकर, स्वप्नील पवार, सोनु गायकवाड, मनीष भोंबळे, करण ठाकुर, योगेश कंचनपुरे, धीरज पवार, गुलाम मुस्तफा आदींची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा