- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
salute-martyrs-hutatma-akola: विश्वमांगल्य सभेतर्फे शहिदांना अभिवादन ; हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम संपन्न, शहीद कुटुंबातील सदस्यांचा केला सन्मान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विश्वमांगल्य सभा अकोलाच्या वतीने स्थानिक हुतात्मा भवन स्मारक येथे भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करीत शहीद कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
विश्व मांगल्य सभा अकोला शाखेच्या वतीने शनिवारी 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता स्थानिक नेहरू पार्क चौक येथील हुतात्मा स्मारक परिसरात पितृ पक्षाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी हुतात्मा स्मारक येथील सर्व 24 शहिदांच्या पुतळ्याला हारा अर्पण, दीप प्रज्वलन करीत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विश्व मांगल्य सभेची प्रार्थना पठण करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांच्या पाच उपस्थित कुटुंबियांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान प्राप्त कुटुंबीयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा खंडेलवाल, विदर्भ प्रदेश संघटक तेजसा जोशी, माजी उप महापौर वैशाली शेळके, संस्कृती संस्कार संस्कृत रक्षक आर्यप्रभा घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शहीद कुटुंबीयांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी विश्व मांगल्य सभा अकोला अध्यक्ष निशा टावरी, उपाध्यक्ष डॉ. अनघा देशपांडे, सचिव वर्षा हुपेले, कोषाध्यक्ष अश्विनी जकाते, गिरिजा जागीरदार, वंदना जकाते, प्रांजल रायपूरे, मनीषा अंबरखाने, स्नेहल जोशी, शुभांगी कुलकर्णी, अपर्णा धोत्रे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुषमा गरुड यांनी तर आभार प्रदर्शन वर्षा हूपेले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा