- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
road-accident-semadoh-amt: सेमाडोह जवळ घाटवळणाच्या रस्त्यावर खासगी बसचा भीषण अपघात; चार ठार, सात गंभीर जखमी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अमरावती: जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ एका खाजगी बसला झालेल्या अपघातात 4 ठार, 7 गंभीर जखमी झाले आहेत. वळणदार रस्त्यावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाखाली पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जखमी प्रवाशांवर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून एनडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहचली होती. हा अपघात सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती ( विदर्भ) जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावाजवळ पुलावरून अती वेगाने जात असलेली खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्याने पुलावरून खाली कोसळली.
अमरावतीहून रोज सकाळी सव्वा पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस आज अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचली. तेथून पुढे धारणीचा टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटातील वळणाच्या रस्त्यावर बस चालकाने अतिशय वेगाने पुढे नेली. आठच्या सुमारास ती बस सेमाडोह गावाजवळील पुलावरून नाल्यात कोसळली.
बसमधील अनेक प्रवाशांना मोठी दुखापत झाल्याने घटनास्थळी स्थानिक नागरिक ,पोलीस पथकाने बचावकार्य करीत जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले. मात्र या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 25 जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 7 प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावती जिल्हा शासकीय रुग्णालय ( इर्विन) येथे उपचारासाठी दाखल केले. उर्वरित 18 प्रवाशांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Latest update
दरम्यान सायंकाळी घटनास्थळी पुलावरून क्रेनने अपघाती बस बाहेर काढताना क्रेंनच पलटली, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सुदैवानं यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा