- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political-news-shiv-sena-ubt: दिलेल्या इशारा नंतरचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात-आमदार नितीन देशमुख यांचा दावा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : आम्ही दिलेल्या इशारा नंतरचं महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात आले असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्याला भेट द्यावी अन्यथा 24 सप्टेंबर नंतर अहमदनगरला जाऊन त्यांना उचलून आणू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जावून सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे. या संदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांना शासकीय विश्रामगृहात घेरावही टाकला. यावेळेस चर्चे दरम्यान विखे पाटील यांनी 25 किंवा 26 सप्टेंबरला विमा कंपनी अधिकारी, कृषी सचिव आणि कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यासोबतच सोयाबीन पिकाच शंभर टक्के नुकसान झाल्याचं ही त्यांनी मान्य केलं. यावेळी विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्याबद्दल त्यांचे आमदार नितीन देशमुख यांनी आभार मानले. सोबतच आपण दिलेल्या इशारामुळे विखे पाटील अकोला दौऱ्यावर आले असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवार फेरी कार्यक्रमाच्या समारोप निमित्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज अकोल्यात आले होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा