- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
leopard-dies-akola-washim-rd: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटचा मृत्यू ; अकोला - वाशिम महामार्गावरील घटना
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पातूर जवळील अकोला - वाशिम महामार्गावरील भंडारज ते नांदखेडा फाट्याच्या मधात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडली.
पातूर वन विभाग अंतर्गत येणाऱ्या सोळा मैल परिसरात वन्य प्राणी मुक्त संचार करतात. यामध्ये सांबर, रानटी डुक्कर, हरीण, रोही यासारखे प्राणी दिसतात. हे प्राणी अकोला हैदराबाद नव्याने बनलेला मार्गवरून ये जा करतात. हा परिसर पहाडी असून बऱ्याचदा या मार्गावर हरीण व रोही अशा वन्य प्राण्यांचे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आज देखील अशीच घटना घडली. या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट ठार झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळल्यानंतर पातुर वन विभागाचे वन अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या वाहनामध्ये मृत बिबट्या अकोला चिकित्सालयामध्ये उत्तरीय प्रक्रियाकरिता पाठविण्यात आला. पुढील तपास पातुर वनविभाग मुख्याधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल करीत आहेत.
या मार्गावर वन्य प्राण्याचे अपघात होणे नित्याचे झाले आहे. वाहन धारकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दुर्मिळ वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाच्या वतीने या परिसरात वन्य प्राण्यांचे संचार असल्याचे फलक लावावे, अशी मागणी पातुर शहरातील व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान दुपारच्या सुमारास रस्ता ओलांडताना हा अपघात झालं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातात ठार झालेला हा बिबट सुमारे 2 ते 3 वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. हा बिबट अपघाता नंतर जख्मी असताना काही काळ तो जिवंत होता, उपस्थित काही नागरिकांनी वन विभागाला संपर्क केला असता मात्र वन विभाग वेळेवर पोहचला नाही आणि शेवटी या बिबटचा मृत्यू झाला असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर काही असंवेदनशील नागरिकांनी मृत बिबट्यासोबत फोटो सेशनही केलं असल्याचे समजते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा