ganesh-festival-2024-akola-: असे करा गणेशोत्सव मिरवणूक आणि मुर्ती विसर्जन नियोजन; गणेश मंडळांना आवाहन

 file image: BAnews24 



Safe Disaster Management Plan - 2024


गणेशमूर्ती विसर्जनाचे

गणेश भक्तांना आवाहन 


श्रीगणेश मुर्ती विसर्जनासाठी घ्यावयाची काळजी 


मुर्ती विसर्जन करण्यासाठी जातांना पोहणार्‍या दहा युवकांची नेमणूक करण्यात यावी. त्यांच्या नावाची मोबाईल नंबरसह यादी तयार करावी. नेमलेल्या दहा युवकांपैकी कोणाचेही ऑपरेशन झालेले नसावे तसेच फीट वैगरे येणारे नसावेत. 


मुर्ती विसर्जनासाठी निवड केलेल्या पाण्याची जागेची वरील दहा युकांना तरी संपूर्ण माहिती देण्यात यावी वरील दहा पैकी कोणीही नशापाणी करणारे नसावेत.


मुर्ती विसर्जनासाठी जातांना चारपाच टार्च पुर्णपणे चार्जिंग केलेल्या आणी चालु कंडीशनसह असाव्यात.



सुस्थितीत असलेलेच वाहन येण्या जाण्याच्या तयारीने पुर्ण डीजेलसह इंडीकेटर लाईट सेल्फ स्टार्ट असावेत वाहन हे धक्क्यावर नसावेत ते पुर्णपणे कार्यान्वित सुसज्ज असावेत.ड्रायव्हर नशापाणी करणारा नसावा तो अनुभवी परवानाधारक असावा.प्रवासा दरम्यान उंचावरील वायर ईत्या.बाजुला कीवा वर उचलण्यासाठी कमीत कमी दहा फुटलांब बासा (येऊ) आकोडासह दोन नग सोबत असावेत.


मुर्ती विसर्जनासाठी जाणार्‍या संख्याची संपुर्ण माहीतीसह यादी/माहीती मंडळातील घरी/ गावात थांबणाऱ्या महत्वाच्या कीमान दोन व्यक्तिंकडे असावी.सोबत असणाऱ्यांपैकी कमीतकमी पाच सहा सदस्यांकडे तरी मोबाईल फोन पुर्णपणे चार्जिंग /बॅलंन्स असलेले सोबत असावेत.तसेच यावेळेत कोणाकडेही मोबाईल हेड फोन नसावेत


मुर्ती विसर्जनासाठी जाण्या पासुन ते परत घरी येईपर्यंत* कोणाचेही सोबत व कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही. यासाठी *महत्वपूर्ण जबाबदार असणाऱ्या किंवा जबाबदारी स्विकारणार्‍या कीमान दोन व्यक्तिंची निवड करावी.



आपल्या सुरक्षित (सेफ) विसर्जनासाठी आमच्या शुभेच्छा आपण सुरक्षित रहा ईतरांना सुरक्षित ठेवा


या काळात आंम्ही आपल्या रक्षणासाठी 24 तास सज्ज आहोत


फक्त एक फोन करा      

आपल्या सेवेत सज्ज 

मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन महाराष्ट्र, (रजी.) 

द्वारा संचालित

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला 

दीपक सदाफळे पिंजर 

जिवरक्षक

9822229471


टिप्पण्या