- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवा या भाजप नेत्याच्या विरोधात अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शनिवारी दुपारी मदनलाल धिंग्रा चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा एक गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही , हे अत्यंत आक्षेपार्ह आहे, असा आरोप करीत या वक्तव्याचा विरोधात आज अकोला शहर काँग्रेसने शहराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले व भाजपचा धिक्कार केला.
आंदोलनात कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना धमकी देणारा भाजपचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणी केली. मारवा यांचे वक्तव्य हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे, म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत असतात. आतातर भाजपाने सर्व मर्यादाच सोडल्या आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाणिवपूर्वक चुकीचा अर्थ काढून माथी भडवण्याचा प्रकार भाजप करीत आहे. तसेच राहुल गांधी यांच्या या एका विधानावरून त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी दिली जात आहे. हे अतिशय निंदनीय आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. तरविंदरसिंह मारवा हे भाजपच्या द्वेषपूर्ण आणि हिंसक राजकारणाच्या कारखान्यात तयार झालेले आहेत,असा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, काँगेस नेते तथा अकोला मनपा माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, महानगर अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील वानखडे, उपाध्यक्ष कपिल रावदेव, डॉ. सुभाष कोरपे, काँग्रेस नेता मेहबूब खान(मब्बा भाई), माजी नगरसेवक मो. इरफान, काँग्रेस नेता अविनाश देशमुख, काँग्रेस नेता निखलेश दिवेकर, काँग्रेस नेता अर्जुन थानवी, काँग्रेस नेता प्रदीप वखारिया, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश कवडे, महिला जिल्हाध्यक्ष पुजा काळे, महिला प्रदेश सचिव विभा राऊत, सेवादल अध्यक्ष तश्वर पटेल, महासचिव महेंद्र गवई, अतुल अमानकर, चंद्रकांत सावजी, ब्लॉक अध्यक्ष गणेश कळसकर, ब्लॉक अध्यक्ष दत्ता देशमुख, अफरोज खान लोधी, तप्पसू मानकीकर, दिनेश खोब्रागडे, शेख अब्दुला, रहमान बाबू, सय्यद यासीन बब्बु भाई, निसार भाई, सरदार ,राजू नाईक, मनीष मिश्रा, शेख हनीफ, प्रशांत प्रधान,पंकज देशमुख, पंकज राठी, अभिजित तवर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा