- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bhaji-bazar-encroachments: शहरातील मुख्य मार्गासह जनता भाजी बाजारातील अतिक्रमण हटविले; मनपाची अतिक्रमण हटाव मोहिम सुरूच
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मनपा नगररचना,अनधिकृत, अतिक्रमण विभागाव्दारे आज शहरातील मुख्य मार्ग तसेच जनता भाजी बाजार येथील अतिक्रमण धारकांवर कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले.
आज 26 सप्टेंबर 2024 रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील गांधी चौक आणि ओपन थिएटर ते फतेह चौक, शिवनी, मेन हॉस्पीटल रोडवरील अतिक्रमणे याचसोबत जनता भाजी बाजार येथील अतिक्रमीत किरकोळ व्यावसायिकांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण करणा-या अतिक्रमणावर मनपा नगररचना, अनधिकृत, अतिक्रमण विभागाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जनता भाजी बाजारातील अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले. मात्र परत या जागांवर अतिक्रमणं होवू नये, यासाठी मनपाने काळजी घावी अथवा सक्षम यंत्रणा निर्माण करून कायम स्वरुपी अतिक्रमण समस्या पासून नागरिकांची सुटका अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली.
या कारवाईत सहायक नगररचनाकार राजेंद्र टापरे, सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, जीवन मानकीकर, रफीक अहमद, स्वप्नील शिंदखेळकर, स्वप्नील पवार, सोनु गायकवाड, मनीष भोंबळे, करण ठाकुर, योगेश कंचनपुरे, धीरज पवार, गुलाम मुस्तफा आदींचा सहभाग होता.
थकित करापोटी पुर्व आणि उत्तर झोन येथील दोन मालमत्तांवर सीलची कारवाई
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती रोड वरील वार्ड क्रं. सी-5 मालमत्ता क्रं. 636 धा.सुभान खां हाजी काले खां, क्वालीटी सॉ मील यांचेकडे 2020-21 ते सन 2024-25 पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 2,51,456/- मालमत्ता कर थकित असल्याने क्वालिटी सॉ मील ला सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. याचसोबत पुर्व झोन अंतर्गत टॉवर चौक स्थित पाडीया कॉम्प्लॅक्स येथील वार्ड क्रं. ए-1 मालमत्ता क्रं. 1954 धा.अरुण कुमार अग्रवाल यांचेकडे 2017-18 ते सन 2024-25 पर्यंतचे एकुण रक्कम रूपये 6,87,204/- मालमत्ता कर थकित असल्याने सदर मालमत्तावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहायक आयुक्त विठ्ठल देवकते आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात झाली असून, या कारवाईत सहायक कर अधिक्षक हेमंत शेळवणे, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, मोहन घाटोळ, स्वाती इंडस्ट्रीजचे प्रोजेक्ट मैनेजर अमित सिंग, विकास शर्मा, शुभम काटे, मुदस्सीर अमीन, साजिद मुसा, रूपेश लोकपुरे, शैलेश गव्हाळे आदींची उपस्थिती होती.
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी आपला थकित व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा करून सील व जप्ती सारख्या अप्रीय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा