- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
assault-case-builder-mishra-: बहुचर्चित बिल्डर रामप्रकाश मिश्रा प्राणघातक हल्ला प्रकरण; नागपूर येथुन एका आरोपीस अटक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर तथा भाजप व विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी रामप्रकाश मिश्रा यांचेवर प्राणघातक हल्ला प्रकरणात अज्ञात आरोपी निष्पन्न करून एका आरोपीस नागपूर येथून काल रात्री स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अटक करून गुन्हयात वापरलेली मोटर सायकल जप्त केली आहे. या आरोपीचे नाव पवन विठ्ठल कुंभलकर असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
30 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी जखमी रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा (वय 55 वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला.) यांनी पोलीस स्टेशन खदान अकोला येथे त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला संदर्भात तक्रार दिली होती. मिश्रा हे 30 ऑगस्ट रोजी नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री 10 वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना, अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटार साययकलवर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून, त्यांना गंभीर जखमी करून आरोपी हे घटनास्थळावरून पळून गेले. अश्या फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन खदान अकोला येथे अपराध नं 628/24 कलम 109, 3 (5) भारतीय. न्याय. संहिता प्रमाणे गुन्हा नोंद असून तपासावर आहे.
या गुन्हयात आरोपी अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलीस निरिक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना सदर गुन्हा उघडकीस आणन्या बाबत सुचना दिल्या. त्या अनुषंगाने शंकर शेळके यांनी सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्यात. तपासक पथकातील अधिकरी आणि अमंलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी रामप्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा ईसम पवन विठ्ठल कुंभलकर (वय 31 वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क्रमांक 2 कनान जि. नागपूर) यांने त्याचे साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे निष्पन्न करून, आरोपी पवन विठ्ठल कुंभलकर याचा पाठलाग तसेच सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. आरोपीस या गुन्हया बाबत विचापूस केली असता त्याने त्याचा सोबती सह गुन्हा केल्याचे कबुली दिली. गुन्हयात वापरलेली एक काळ्या रंगाची बजाज पल्सर गाडी (विना नंबरची) पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपीस मुद्देमालासह पोलीस स्टेशन खदान येथे पुढील तपास कामी देण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे यावेळी बच्चन सिंह यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेला आरोपी पवन कुंभलकर याचे वर याआधी नागपूर पोलिसात भारतीय दंड विधान अन्वये 302 चा गुन्हा दाखल आहे. मिश्रा हल्ला प्रकरणात हा आरोपी वॉन्टेड असताना पोलीस तपासात तो काही दिवस दिल्ली असल्याचे समोर आले तसेच या प्रकरणांमध्ये आणखी तीन आरोपी सामील असून यांची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणांमध्ये हल्ला करण्यामागील नेमका उद्देश काय, हा हल्ला कोणी केला किंवा करावीला याबाबत अद्याप आरोपींकडून माहिती मिळाली नाही. हा हल्ला आर्थिक व्यवहारातून अथवा राजकीय पार्श्वभूमीवरून झाला याबाबत निश्चित माहिती अद्यापही आरोपींकडून मिळाली नाही. लवकरच हल्ला का आणि कशासाठी कऱण्यात आला, याबाबत उलगडा होईल,असे बच्चन सिंह यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शंकर शेळके उपास्थित होते.
कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पो.नि शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, आशिष शिंदे, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, गोकूल चव्हाण, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, आकश मानकर, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, लिलाधर खंडारे, भिमराव दिपके, सतिष पवार, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, तसेच चालक प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, सायबर पो. स्टे. चे आशिष आमले, गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा