- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
shyam-zulan-festival-sawan: अकोल्यात श्याम झुलन महोत्सवाचे आयोजन; आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक संजय मित्तल यांची भजन संध्या, श्याम शीशचे होणार दर्शन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: धार्मिक उपक्रम साकार करणाऱ्या महानगरातील ‘श्याम के दिवाने’ ग्रुपच्या वतीने श्रावण मास निम्मित बुधवार 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मुर्तिजापूर रोडवरील सीएससी रिसॉर्ट येथे भव्य दिव्य श्याम झुलन महोत्सव आयोजित केला आहे.
यामध्ये कोलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय भजनकार संजय मित्तल हे श्याम बाबाचे संगीतमय भक्ती गीते व भजने सादर करणार असून, प्रथमच पवित्र खाटू श्याम धाम येथून श्याम बाबांचे पवित्र जातीयुक्त शिशचे भाविकांना दर्शन होणार असल्याची माहिती रविवारी गीता नगर येथील रामदेव बाबा श्याम बाबा मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी शाम के दिवाने ग्रुपचे सेवाधारी अरुण शर्मा, सुमित शर्मा, एडवोकेट सौरभ शर्मा यांच्या उपस्थितीत या एकदिवशीय महोत्सवाची माहिती देण्यात आली.
शाम के दिवाने हा सांस्कृतिक सामाजिक सेवा उपक्रम राबविणारा युवकांचा ग्रुप असून, या समूहाच्या वतीने खाटू नरेश यांच्या पावनभक्तीत आतापर्यंत खंडेलवाल भवन, बंधन सभागृहात अनेक ख्यातनाम राष्ट्रीय भजनकारांच्या उपस्थिती श्याम झुलन महोत्सव मोठ्या भक्तीमुळे वातावरणात साजरे करण्यात आले. या उत्सवांना दूरवरून भाविकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हा समूहाचा द्वितीय महोत्सव असून, या महोत्सवाची संपूर्ण थीम ही श्रावण मासातील हिरव्यागार वनश्री हरियाली तीजवर आधारित राहणार आहे.
या भक्तीमय झुलन महोत्सवात भजनकार संजय मित्तल बाबांची भजने सादर करणार असून, या महोत्सवात खाटू शामची पुजारी पुरुषोत्तम शर्मा हे पूजा विधि व अनुष्ठान पार पाडणार आहेत. भजनकार संजय मित्तल यांना पंडित उमेश शर्मा ढब्बू, पंडित गोपाल शर्मा हारे व नेतल शर्मा यांची साथ मिळणार आहे. तर बाबा शामची शृंगार सेवा श्री श्याम शृंगार समिती करणार आहे.
सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या महोत्सवात जाण्या येण्यासाठी भक्तांची मोफत सोय करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रामदेव बाबा श्याम बाबा मंदिर गीता नगर व खंडेलवाल भवन आळशी प्लॉट येथून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवातून परत हे वाहन रात्री अकरा वाजता येणार आहेत.
पावसाची शक्यता लक्षात घेता समूहाच्या वतीने भक्तांना भजन संस्थेचा लाभ घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवात वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, जालना, नांदेड, हिंगोली आदि जिल्ह्यातील शेकडो भक्तजन उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवास विशेष सहयोगी म्हणून सीएससी रिसॉर्टचे दीपक शर्मा, श्रीकांत तोष्णीवाल, संजय अग्रवाल, जुगल खंडेलवाल, कल्पेश खंडेलवाल, जितेंद्र ठाकूर, संजय शर्मा नर्सरी, किशोर अग्रवाल यांचे सहकार्य मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय भजनकार संजय मित्तल यांच्या मोफत असणाऱ्या श्याम भजन संध्या व दिव्य शीश दर्शनाचा सर्व श्याम भक्त महिला व पुरुषांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत शाम के दिवाने ग्रुपचे सेवाधारी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा