shiv-sena-shiv-doot-akola-dist: एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहता कामा नये- गोपिकीशन बाजोरिया




ठळक मुद्दा 

शिवदूत घराघरापर्यंत जावून करणार विविध योजनांची जनजागृती




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना.अजित पवार या त्रिमूर्ती शक्तींनी राज्यातील जनतेच्या हितासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.त्याची प्रभावी अंमलबजावणी होवून एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी शिवदूतातर्फे घरोघरी जावून योजनेची जनजागृती करणार असल्याचे मत शिवसेना नेते माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी बुधवार १४ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 




महाराष्ट्र सरकारने या वर्षात राज्यातील जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. सदर योजना गरजू पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील प्रयत्न करीत आहेत.या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी शिवदुताच्या माध्यमातून आणखी गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे. या योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री मुलींची मोफत शिक्षण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आदी योजनांचा समावेश आहे. या संदर्भात गावागावात कॉर्नर बैठका घेऊन देखील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


रद्द अर्जाबाबत पाठपुरावा करणार


लाडकी बहीण योजनेसोबत इतर योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द झाले असतील तर त्याच्या त्रुटी पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन दरबारी पुन्हा अर्ज करण्यासंदर्भात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी दिली.



जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी दिली विविध योजनांची माहिती


बुधवारी शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी संबंधित योजनांच्या साठी लागणारे कागदपत्रे व पात्रता व प्रक्रिया या संदर्भात विस्तृत माहिती दिली.यामध्ये राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व योजना या पुढील प्रमाणे आहेत.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना


पात्रता-महिलेचे वय १ जुलै २०२४ पर्यंत किमान २१ व कमाल ६५ वर्ष असणे आवश्यक आहे.विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्ज करू शकतात.उत्पन्न दाखला नसेल तर नाव रेशन कार्ड मध्ये असणे आवश्यक आहे.आधारकार्ड, दोन पासपोर्ट फोटो, पासबुक, अधिवास प्रमाणपत्र, किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, टिसी, अडीच लाखापेक्षा कमी उत्पनाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत.


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना


सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस धारकांनी केवायसी गॅस कनेक्शन वितरकाजवळ करणे आवश्यक आहे.


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना


उमेदवाराचे वय किमान १८ ते ३५ वर्ष असावे, शैक्षणीक पात्रता बारावी पास, आयटीआय पदविका, पदवी व पदव्युत्तर असावी.उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असावा. उमेदवारांनी कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.


मुख्यमंत्री मुलींची मोफत शिक्षण योजना


व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्टया दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुक्ल व परीक्षा शुल्कात शंभर टक्के लाभ मिळणार आहे.


मुख्यमंत्री लेक लाडकी योजना


पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माने येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू असेल.माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक आहे.


मुख्यमंत्री वयोश्री योजना


लाभार्थ्या व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत ६५ वर्ष पूर्ण केलेले असावे. बीपीएल रेशनकार्ड  किंवा निवृत्तिवेतन योजनेचा पुरावा असणे आवश्यक आहे.


मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना 


लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी व आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.आधारकार्ड, रेशनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.






यावेळी युवासेना प्रदेश सचिव विठ्ठल सरप, जिल्हाप्रमुख आश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषा विरक, शहरप्रमुख रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.


टिप्पण्या